चक्क अभिनेत्री सिन्हाच्या समोर खऱ्या सिंहाने फोडली डरकाळी Video

सोनाक्षी सिन्हा(actress) आणि झहीर इक्बाल यांचे लग्न झाल्यापासून दोघेही अनेकदा सुट्टीवर फिरताना दिसले आहेत. दोघेही त्यांच्या प्रत्येक व्हेकेशन ट्रिपचे फोटो त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करत असतात. नुकत्याच झालेल्या प्रवासात त्याच्यासोबतचा एक अविस्मरणीय अनुभव आला.

सोनाक्षीने(actress) या घटनेचा व्हिडिओही बनवला असून तो तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केला आहे. सोनाक्षीला तिच्या नुकत्याच प्रवासादरम्यान सिंहाचा सामना करावा लागला आहे. या व्हिडीओने आता सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. सर्वत्र हा व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

सोनाक्षी सिन्हाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती एका काचेच्या चेंबरसारख्या खोलीत बसलेली दिसत आहे, सकाळचे सहा वाजले आहेत. या व्हिडिओमध्ये काचेच्या खोलीबाहेर सिंह गर्जना करताना दिसत आहे.

सोनाक्षी सिंहाच्या डरकाळ्याला अजिबात घाबरलेली दिसली नसून, ती या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवताना दिसली आहे. तिच्या या व्हिडिओवर सोनाक्षीने लिहिले आहे – ‘आज सकाळचे अलार्म घड्याळ.’ या व्हिडिओमध्ये सोनाक्षीसोबत पती झहीर इक्बालही दिसत आहे, तो सोनाक्षीसोबत हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे.

सोनाक्षीचा हाच व्हिडिओ अनेक सोशल मीडिया पेजवर व्हायरल होत आहे. सोनाक्षी सिन्हाच्या चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. अलीकडे देखील, सोनाक्षी आणि झहीर इक्बाल यांनी त्यांच्या वाइल्ड लाइफ व्हेकेशनचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. दोघेही अनेकदा मजेदार व्हिडिओ बनवतात आणि त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करताना दिसत असतात. सोनाक्षी आणि झहीर इक्बालचे व्हिडिओही चाहत्यांना खूप आवडतात. आणि ते त्यांना खूप प्रतिसाद देतात.

2024 मध्ये सोनाक्षी सिन्हा ‘काकुडा’ या हॉरर-कॉमेडी चित्रपटात दिसली होती. यात अभिनेत्रीने दुहेरी भूमिका साकारली होती. या चित्रपटात रितेश देशमुखही दिसला होता. पुढच्या वर्षी देखील अभिनेत्रीचा एक हॉरर चित्रपट प्रदर्शित होणार आहे, या चित्रपटाचे नाव आहे ‘निकिता रॉय-द बुक ऑफ डार्कनेस’ आहे. या चित्रपटाच्या पोस्ट-प्रॉडक्शनचे काम सध्या सुरू आहे. ज्याची घोषणा अभिनेत्री लवकरच करणार आहे.

हेही वाचा :

जसप्रीत बुमराहला ‘टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर’साठी नामांकन, या दिग्गज खेळाडूंचा समावेश

सुरेश धसांना ‘ते’ वक्तव्य भोवणार? महिला आयोग अ‍ॅक्शनमोडमध्ये, पोलिसांना दिले ‘हे’ निर्देश

दोस्त दोस्त ना रहा! जखमी मित्राला रुग्णालयात नेण्याऐवजी…; पोलिसांकडून गुन्हा दाखल