अजितदादा अन् शरद पवार एकत्र येणार का? बावनकुळे म्हणाले, “भाजपकडून काहीच..”

विधानसभा (politics)निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील का अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यात आज नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी अजित पवार यांच्या मातोश्री आशा पवार यांनी कुटुंबातील वाद मिटू देत.

शरद पवार आणि अजित पवार एकत्र यावेत अशी इच्छा व्यक्त केली. यानंतर राज्याच्या (politics)राजकारणात काका-पुतण एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या चर्चांवर आता राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केलं आहे. एकत्र यायचं की नाही हा निर्णय दोन्ही नेत्यांनी घ्यायचा आहे, असे बावनकुळे म्हणाले आहेत.

मंत्री बावनकुळे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर मत व्यक्त केले. अजित पवार आणि शरद पवार एकत्र यावेत अशी चर्चा सुरू झाली आहे असे विचारताच बावनकुळे म्हणाले, एकत्र यायचं की नाही याचा निर्णय त्या दोघांनीच घ्यायचा आहे.

भारतीय जनता पार्टीकडून ना असण्याचं काहीच कारण नाही. त्या पक्षाने निर्णय घ्यायचा आहे त्यांच्या नेत्यांनी हा निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे त्यांच्या निर्णयात मी बोलणं योग्य होणार नाही.

आमदारांनी सरकारवर विश्वास ठेवाव असे तुम्ही म्हणाला होतात ही सूचना फक्त आमदार सुरेश धस यांच्यासाठी होती की सर्व आमदारांसाठी या प्रश्नावर बोलताना बावनकुळे म्हणाले, मीडियामध्ये बोलण्याआधी संबंधित प्रकरणी सरकार काय कार्यवाही करत आहे याची माहिती आमदारांनी घेतली पाहिजे. तपासात आणखी काही गोष्टींची माहिती द्यायची असेल तर मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा केली पाहिजे.

पण मीडियात काही बोललं गेलं तर तपास यंत्रणांनाही दडपण असतं की काही वेगळं वळण मिळतंय का? अनेक अडचणीही तयार होतात. त्यामुळे मीडियात बोलण्याआधी सरकार किंवा मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली तर यातून चांगला मार्ग निघेल, तपास योग्य होईल तसेच ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांना मदत होईल असं मला वाटतं असे बावनकुळे म्हणाले.

हेही वाचा :

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी मुलाने आईसह 4 लाडक्या बहि‍णींच्या गळ्यावरून फिरवला ब्लेड

महावितरणकडून ग्राहकांना नवीन वर्षाची भेट! जानेवारीच्या बिलात मिळणार घसघशीत सूट

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारची मोठी भेट; घेतला ‘हा’ मोठा निर्णय!