मनोज जरांगेंचा सरकारला इशारा; फरार आरोपींना अटक न झाल्यास मराठे रस्त्यावर उतरणार

बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील(political update) मुख्य आरोपी अद्यापही मोकाटच आहेत. वाल्मीक कराड याला सीबीआयने ताब्यात घेतले असून कोर्टाने १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, मुख्य आरोपींना (political update)अटक करण्याच्या मागणीसाठी आज मस्साजोग येथील ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन केले. तर दुसरीकडे मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी फरार आरोपींना अटक करण्याची मागणी केली, अन्यथा रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा दिला.

मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आज माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारला इशारा दिला. जरांगे पाटील म्हणाले, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अजूनही मुख्य आरोपी फरार आहेत. सर्व आरोपींना अटक होऊन न्याय मिळावा अशी आमची इच्छा आहे. वाल्मीक कराड याला अटक झाली आहे. आता मोठे मासे सापडती, आरोपींना अटक नाही झाल्यास आम्ही रस्त्यावर उतरणार, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

“या प्रकरणात पोलिस कुणालाही सोडणार नाहीत. यावेळी धनंजय मुंडे यांच्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला, यावर बोलताना जरांगे म्हणाले, चौकशी सुरु आहे. संबंध आहे की नाही हे सिद्ध होईलच. यामध्ये जे जे येतील त्यांना सु्ट्टी दिली तर महाराष्ट्र बंद पाडणार, असंही जरांगे पाटील म्हणाले.

मराठा आरक्षणावर बोलताना जरांगे म्हणाले, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे मराठा आरक्षणाविषयी येणाऱ्या 25 तारखेपर्यंत काय निर्णय घेतात याकडे आमचे लक्ष लागले आहे. २५ जानेवारीपासून आम्ही आमरण उपोषण करणार आहे. याआधीही सरकारमध्ये हेच लोक होते, आथा फक्त खांदे बदलले आहेत, असंही जरांगे पाटील म्हणाले.

हेही वाचा :

अजितदादा अन् शरद पवार एकत्र येणार का? बावनकुळे म्हणाले, “भाजपकडून काहीच..”

महाराष्ट्रात क्रांती, पहिले AI धोरण जाहीर होणार; मंत्री आशिष शेलार यांनी घेतला आढावा!

“ICC रँकिंगमध्ये बुमराहचा पराक्रम; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय क्रिकेटर!