‘माझा निर्णय योग्य होता! मी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मिस करत नाही’ MS Dhoni निवृत्तीवर काय म्हणाला ?

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने निवृत्तीनंतरच्या आयुष्याबद्दल महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती(retirement) घेतलेल्या धोनीने आता कुटुंबासमवेत आणि आयपीएलमध्ये खेळत आनंदी आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला आहे. युरोग्रीप टायर्सच्या युट्यूब मुलाखतीत धोनीने आपल्या निवृत्तीबाबत आणि निवृत्तीनंतरच्या जीवनाबद्दल व्यक्त झाले.

धोनी म्हणाला, “मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला मिस करत नाही, कारण मी हा निर्णय (retirement)विचारपूर्वक घेतला होता. आता मला माझ्या कुटुंबासमवेत जास्त वेळ घालवता येतो, मित्रांसोबत वेळ देऊ शकतो, आणि मोटारसायकल राईड्सचा आनंद घेऊ शकतो.” त्याने विशेषतः आपल्या मुली सोबत वेळ घालवण्याचा उल्लेख केला आणि तो त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा असल्याचे सांगितले.
धोनीच्या निवृत्तीचा किस्सा उलगडताना माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सांगितले की, “धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय अतिशय साध्या पद्धतीने घेतला. त्याने खेळाडूंच्या बैठकीत हा निर्णय जाहीर केला, ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला.”
निवृत्तीनंतर धोनी आपल्याला चेन्नई सुपर किंग्सकडून आयपीएलमध्ये खेळताना दिसतो. आगामी आयपीएल २०२५ साठी सीएसकेने धोनीला अनकॅप्ड खेळाडू म्हणून ४ कोटी रुपयांच्या करारावर रिटेन केले आहे. धोनीचा हा १८ वा आयपीएल हंगाम असेल, आणि तो मैदानावर आपला जलवा दाखवण्यासाठी सज्ज आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ३५० वन-डे, ९० कसोटी, आणि ९८ टी-२० सामन्यांमधील त्याच्या धडाकेबाज कामगिरीने धोनीने स्वतःला क्रिकेटच्या इतिहासातील एक महान खेळाडू म्हणून सिद्ध केले आहे. आता निवृत्तीनंतर तो एक ताणमुक्त आणि आनंदी आयुष्य जगत आहे.
हेही वाचा :
बॅंकेत महत्त्वाचे काम आहे? मग… जानेवारी महिन्यातील ‘ही’ सुट्ट्यांची यादी वाचाच…
CM फडणवीसांचं कौतुक, रश्मी शुक्लांना शुभेच्छा अन् बाबरीवरून पोस्ट; नार्वेकरांच्या हाती ‘ बंडखोर’ मशाल?
शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार? बड्या नेत्यानी केलं वक्तव्य