बहिणींचा लाडकी-नावडती भेद मिटवा”: राज ठाकरेंची सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त भावनिक पोस्ट

राज्यामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये (Celebration)साजरी केली जात आहे. यंदा सावित्रीबाई फुले यांची 194 वी जयंती आहे. राज्यभरामध्ये मोठ्या उत्साहाने जयंती साजरी केली जात आहे. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी साताऱ्यातील नायगाव या गावी झाला.

त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता म्हणून राज्य सरकारकडून विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. अनेक राजकीय व्यक्तींनी नायगावमध्ये जाऊन अभिवादन केले आहे. मनसे नेते राज ठाकरे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या(Celebration) जयंतीनिमित्त खास पोस्ट करुन अभिवादन केले आहे. तसेच त्यांनी सत्ताधारी नेत्यांना देखील टोला लगावला आहे.

मनसे नेते राज ठाकरे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त खास पोस्ट केली आहे. भारतात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ ज्यांच्यामुळे रोवली गेली आणि महात्मा ज्योतिबा फुलेंना सत्यशोधनाच्या खडतर प्रवासात ज्यांनी मोलाची साथ दिली, त्या सावित्रीबाई फुलेंची आज जयंती. स्त्री स्वातंत्र्य औषधाला देखील सापडणार नाही अशा काळात सावित्रीबाईंचा जन्म झाला.

तो काळ असा होता की स्त्री शिकली तर तिच्या सात पिढ्या नरकात जातील असं मानण्याचा काळ. पण ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले हे दोघेही ज्ञानासाठी आसुसलेले होते, आणि त्यामुळेच ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईनी शिक्षणाचा मार्ग स्वीकारला आणि इतकंच नाही तर मुलींसाठी शाळा सुरु केली. त्यावेळच्या अखंड हिंदुस्थानातील, स्वदेशीय व्यक्तीने काढलेली पहिलीच मुलींची शाळा.

पण सावित्रीबाईंना प्रचंड अहवेलना, आणि उपहास सहन करावा लागला. आज थेट अंतराळात झेप घेणारी स्त्री असो की एखाद्या उद्योगसमूहाची प्रमुखपदी बसलेली स्त्री असो, तिचा हा प्रवास सावित्रीबाईंमुळेच शक्य झाला हे नक्की. सावित्रीबाई फुलेंच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं अभिवादन.

२ वर्षांपूर्वी तत्कालीन राज्य सरकारने पुण्यात ज्या भिडे वाड्यात सावित्रीबाई फुलेंनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली, त्या वाड्याचं रूपांतर राष्ट्रीय स्मारकात करण्याची घोषणा केली होती. या घोषणेचं तेंव्हा आम्ही स्वागत केलं होतं आणि हे स्मारक लवकरात लवकर व्हावं अशी अपेक्षा व्यक्त केली होती.

मध्यंतरी या स्मारकाचं कामकाज कुठवर आलं आहे हे जाणून घेतलं, तेंव्हा कळलं की मध्यंतरी हे काम अनेक कायदेशीर गुंतागुंतीत अडकलं होतं, त्यातले काही विषय न्यायप्रविष्ट होते, जे आता सुटलेत. मुळात इतक्या मोठ्या महापुरुषांच्या स्मारकांसाठी देखील आपल्याला कायदेशीर लढाया लढाव्या लागतात हेच दुर्दैव. असो.

हेही वाचा :

धक्कादायक! घरगुती खरेदीसाठी सरकारी तिजोरीच केली साफ, महानगरपालिकेच्या आयुक्ताचा प्रताप

या 3 राशींचे अच्छे दिन सुरू होणार, ज्योतिषशास्त्रात म्हटलंय..

चाणक्य नीती : ‘या’ गोष्टींची घ्या काळजी, देवी लक्ष्मीचा राहील आशिर्वाद