सरड्याचे बायसेप्स पाहून थक्क व्हाल! जिममध्ये डीप्स मारताना दिसला, बायसेप्स पाहून व्हाल हैराण; मजेदार Video Viral
सोशल मीडियावर (social media)नेहमीच अनेक वेगवगेळ्या प्रकारचे व्हिडिओज शेअर होत असतात. यात कधी स्टंट्सचे व्हिडिओज शेअर केले जातात तर कधी अपघातांचे तसेच इथे बऱ्याचदा काही हशयास्पद आणि थक्क करणारे व्हिडिओ देखील शेअर होतात जे पाहून कुणीही अचंबित होईल.
सध्या असाच एक व्हिडिओ इथे व्हायरल झाला आहे, हा व्हिडिओ पाहून तुमच्या पायाखालची जमीन हादरेल कारण व्हिडिओत असे काही दृश्ये दिसून येत आहेत जे पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास ठेवने कठीण जाईल.
नुकतेच नववर्ष सुरु झाले आहे. या नवीन वर्षाच्या सुरुवातीस एक अनोखा व्हिडिओ (social media)सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नवीन वर्षात अनेकजण काही ना काही संकल्प बनवत असतात कुणी वजन कमी करण्याचा संकल्प बनवतो ते कुणी पैसे कमी खर्च न करण्याचा तर कुणी कमी शॉपिंग करण्याचा संकल्प बनवत.
आता ही तर झाली माणसांची गोष्ट मात्र तुम्हाला माहिती आहे का? माणसचं नाही तर प्राणीही नवीन वर्षासाठी संकल्प करत असतात. होय, हे खरे आहे. सध्या सोशल मीडियावर सरड्याने नवीन वर्षात केलेल्या अनोख्या संकल्पाचा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. व्हिडिओतील दृश्ये इतकी आश्चर्यकारक आहेत की पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, तुम्ही पाहू शकता यात दोन सरडे एका जिममध्ये व्यायाम करताना दिसून येत आहे. हे सरडे यावेळी डीप्स मारत आहेत. यावेळी सरडे अशाप्रकारे कसरत करत असतात की पाहून कोणालाही आश्चर्य वाटेल. आता खरं सांगायचं झालं तर, सरडे शिकार करण्यापूर्वी आपल्या शरीराचे तापमान वाढवतात, जेणेकरून त्यांना शिकार करताना कोणत्याही अडचणी निर्माण होऊ नये आणि ते सहज शिकार करू शकतील.
हे तापमान वाढण्यासाठी ते अशा प्रकारच्या हालचाली करतात. पण गंमत म्हणजे, सरडा जेव्हा अशा हालचाली करत होता तेव्हा ते पाहून तो जिममध्ये डिप्स मारत असल्याप्रमाणे दिसून येते. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून लोक याची फार मजा घेत आहेत.
सरड्याच्या व्यायामाचा हा मजेदार व्हिडिओ @ladbible नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘नवीन वर्ष, नवीन मी’ असे लिहिण्यात आले आहे.
व्हिडिओला आतापर्यंत अनेक लोकांनी पहिले असून अनेकांनी यावर कमेंट्स करत सरड्याच्या या कृतीवर आपल्या प्रतिरक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरन लिहिले आहे, “अधिक उत्कटता, अधिक उत्कटता, अधिक ऊर्जा” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “त्यांनी चटई साफ केल्याची खात्री करून घ्या”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.
हेही वाचा :
दारुचा एक पेग थंडीत उबदार करतो का की हे एक भ्रामक धारण आहे जाणून घ्या
मोबाईलसाठी तगादा लावत 17 वर्षांच्या मुलाची आत्महत्या वडिलांनीही संपवलं जीवन
करोडपती व्हायचंय? मग, वाट का पाहता फक्त ‘हा’ सोपा फॉर्मुला फॉलो कराच!