बस अचानक सुरु झाली अन् पुढं घडलं भयंकर!

आजकाल मुंबईकर सुखकर प्रवास करायचा असल्यास बेस्ट बसला(bus) प्राधान्य देतात. कारण बेस्ट बसने कमी खर्चात सुखकर प्रवास होतो. मात्र आता बेस्ट बस दोन जणांच्या जीवावर बेतली आहे. मुंबईतील विक्रोळी परिसरात अपघाताची एक धक्कादायक घटना घडली आहे.

आज विक्रोळीतील कन्नमवार नगर भागात बेस्ट बसने(bus) दोन जणांना उडवल्याची घटना घडली आहे. यावेळी विक्रोळीतील कन्नमवार नगर या भागात बेस्ट बसचा डेपो आहे. मात्र आज याठिकाणी चालू अवस्थेत असलेली बस अचानक पुढे आली आणि दोन जणांना जोराची धडक दिली. मात्र या धडकेत दोन्ही प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

या धक्कादायक अपघाताची घटना घडताच घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी दोघांनाही स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. मात्र या घटनेतील दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, विक्रोळीच्या कन्नमवारनगर या परिसरात बेस्ट बस चालक हा बस सुरू ठेवून नियंत्रण कक्षात गेला होता. मात्र यावेळी ही बस अचानक सुरू झाली आणि वेगानं एका चहाच्या स्टॉलला धडकली. दरम्यान, या चहाच्या स्टॉलसमोर उभे असलेले दोघेजण गंभीररित्या जखमी झाले.

मात्र या अपघाताची घटना समोर आल्यानंतर दोन्ही जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं आहे. मात्र आता हा संपूर्ण नेमका प्रकार काय होता? याची चौकशी बेस्ट प्रशासन करणार आहे. तसेच या घटनेतील बस चालकावर देखील कुठला गुन्हा दाखल होतो का? हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे.

हेही वाचा :

अभिनेते टिकू तलसानिया यांना हृदयविकाराचा झटका, केलं रुग्णालयात दाखल

आज ते पप्पी घेत आहेत ठाकरे कुणाचेच नाहीत गुलाबराव पाटील खोचक टीका

धक्कादायक, 4 वर्षात 64 जणांकडून लैंगिक शोषण, किशोरवयीन मुलीच्या दाव्याने सगळेच हादरले