‘आदित्य ठाकरेंच्या वैयक्तिक फायद्यासाठी आघाडी तोडण्याचा निर्णय…’; आंबेडकरांचा हल्लाबोल
विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला(political news) आलेल्या अपयशानंतर आता मविआतील घटक पक्षांत खटके उडायला सुरुवात झाली. अशातच ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी महापालिकेच्या सर्वच्या सर्व निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचं स्पष्ट केलं. यावर आता वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केलं. ठाकरे गटाचा हा निर्णय आदित्य ठाकरेंच्या वैयक्तिक फायद्यासाठी घेण्यात आला, असा आरोप आंबेडकर यांनी केला.
पुढील काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (political news)जाहीर होण्याची शक्यता आहे. यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली. ठाकरे गटाने स्वबळाचा नारा दिला. त्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी सोशल मीडियावर अकाऊंट एक्सवर एक ट्वीट केलं. त्यांनी लिहिलं की, शिवसेनेनं (ठाकरे गट) महाविकास आघाडी तोडण्याचा घेतलेला निर्णय हा आदित्य ठाकरे यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी घेण्यात आला, असं गंभीर आरोप आंबेडकरांनी केला.
तर आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले, त्यांची इच्छा असेल स्वबळावर जायची तर त्यांना थांबवणारे आम्ही कोण? पण विधानसभेच्या पराभवानंर आपण एकत्रित राहायला पाहिजे होतं, अस माझं वैयक्तिक मत आहे. त्यामुळे हा निर्णय खूप घाईघाईने घेतलेला दिसतोय. ग्राऊंडवर कार्यकर्त्यांचं मत काय आहे हे आम्हाला माहितेय. त्यामुळं हा निर्णय योग्य आहे, असं मला वाटत नाही.
आज माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, मुंबईपासून नागपूरपर्यंत आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार आहोत. आता काय होईल ते होईल. आम्हाला एकदा स्वबळ आजमावून पाहायचं आहे, असं राऊतांनी स्पष्ट केलं.
आम्ही नागपूरला सुध्दा स्वबळावर लढणार आहोत. उद्धव ठाकरे यांनी मला तसे संकेत दिले आहेत. आम्ही मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर महानगरपालिकांमध्ये स्वतंत्रपणे निवडणुका लढवू. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांना संधी मिळाली नाही. याचा फटका पक्षाच्या वाढीला बसतो. त्यामुळं महापालिका, जिल्हा परिषदा आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुका आम्ही स्वतंत्रपणे लढणार, असं राऊत म्हणाले.
हेही वाचा :
धक्कादायक, 4 वर्षात 64 जणांकडून लैंगिक शोषण, किशोरवयीन मुलीच्या दाव्याने सगळेच हादरले
‘मला मारु नका रे, मी नाव सांगणार नाही, संतोष देशमुख करत होते याचना’; सुरेश धस यांचा गौप्यस्फोट
एक दम से वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए! आधी वाचवले अन् मग धू धू धुतले, Viral Video