संध्या चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुनची सुटका? परदेशात जाण्याचीही मिळावी परवानगी!
‘पुष्पा २’ चित्रपटाच्या(Entertainment news) प्रीमियरदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात हैदराबादच्या नामपल्ली न्यायालयाने अभिनेता अल्लू अर्जुनला खूप दिलासा दिला आहे. गेल्या महिन्यात या अभिनेत्याला अटक करण्यात आली होती पण नंतर त्याला जामिनावर सोडण्यात आले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अल्लू अर्जुनला दर रविवारी चिक्कडपल्ली पोलिस स्टेशनमध्ये उपस्थित राहण्यापासून सूट देण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांच्या कायदेशीर पथकाने न्यायालयात ही विनंती केली होती. याशिवाय अभिनेत्याला आता परदेशात जाण्याची परवानगीही मिळाली आहे.
४ डिसेंबर २०२४ रोजी हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये (Entertainment news)अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती तेव्हा चाहत्यांमध्ये खूप चेंगराचेंगरी झाली होती. जेव्हा अभिनेता त्याच्या गाडीतून उतरला आणि चाहत्यांनी त्याचे स्वागत केले तेव्हा परिस्थिती आणखी बिकट झाली. यानंतर तिथे गोंधळ उडाला. या घटनेत एका ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आणि तिचा आठ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला आणि तो अजूनही रुग्णालयात दाखल आहे. त्याची तब्येत आता सुधारली आहे.
या घटनेनंतर १३ डिसेंबर २०२४ रोजी अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली. त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. अटकेनंतर लगेचच त्याला अंतरिम जामीन मिळाला. नंतर, ३ जानेवारी २०२५ रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयात हजर झाल्यानंतर त्यांना नियमित जामीन मंजूर करण्यात आले होते. यापूर्वी न्यायालयाने त्यांना पुढील आदेश येईपर्यंत दर रविवारी पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश दिले होते.
काही दिवसांपूर्वी ७ जानेवारी रोजी अल्लू अर्जुन रुग्णालयात जखमी मुलाला भेटला. तसेच त्याला लवकर बरे होण्याच्या शुभेच्छा दिल्या. तसेच अभित्याने त्यांच्या कुटूंबाला पैशाची मदत देखील केली. तथापि, अभिनेत्याची सुटका होऊनही, अल्लू अर्जुनचे कायदेशीर अडचणी संपलेले नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस अधिकारी त्याच्या जामिनाच्या विरोधात याचिका दाखल करू शकतात.
हेही वाचा :
‘मला मारु नका रे, मी नाव सांगणार नाही, संतोष देशमुख करत होते याचना’; सुरेश धस यांचा गौप्यस्फोट
एक दम से वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए! आधी वाचवले अन् मग धू धू धुतले, Viral Video
‘आदित्य ठाकरेंच्या वैयक्तिक फायद्यासाठी आघाडी तोडण्याचा निर्णय…’; आंबेडकरांचा हल्लाबोल