जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर? स्टार गोलंदाजाच्या फिटनेसबाबत आली मोठी अपडेट

चॅम्पियन्स(Champions)ट्रॉफी 2025 सुरु होण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. मात्र असं असतानाच टीम इंडियाचं टेंशन वाढवणारी बातमी सध्या समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफी दरम्यान टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला दुखापत झाली होती. सिडनी टेस्ट दरम्यान झालेली बुमराहच्या पाठीला झालेली दुखापत अद्याप ठीक झालेली नाही. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीतील टीम इंडियाच्या काही सामन्यांमधून बुमराह बाहेर राहू शकतो.

जसप्रीत बुमराहच्या पाठीला सूज आली असून त्याला लवकरात लवकर बंगळुरूच्या नॅशनल क्रिकेट अकॅडमीमध्ये रिपोर्ट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिथे त्याच्या फिटनेसकडे लक्ष देण्यात येईल. 19 फेब्रुवारी पासून सुरु होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जगभरातील टॉप 8 संघ एकमेकांशी भिडणार असून यातील एक संघ विजेतेपदाच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरेल. 2017 नंतर प्रथमच 2025 मध्ये चॅम्पियन्स(Champions) ट्रॉफी खेळवली जाणार असून भारताचे सर्व सामने हे दुबईत खेळवले जातील.

टीम इंडियाचे सिलेक्टर अजित आगरकर, कर्णधार रोहित शर्मा, हेड कोच गौतम गंभीर आणि बीसीसीआयचे पदाधिकारी यांच्यात शुक्रवार 11 जानेवारी रोजी मुंबईत बैठक झाली. याबैठकीत बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील पराभव, आगामी इंग्लंड विरुद्ध वनडे, टी 20 सीरिज आणि चॅम्पियन्स ट्रॉफी याबाबत चर्चा झाली. यात आगरकर यांनी बुमराहच्या फिटनेसबाबत सुद्धा सर्वांना अपडेट केले. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी 12 जानेवारी पर्यंत सर्व देशांना आपल्या संघांची घोषणा करायची आहे, परंतु बीसीसीआय आयसीसीकडून संघाची घोषणा करता काही दिवसांची वाढीव मुदत मागणार आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार जसप्रीत बुमराह दुखापतीच्या कारणामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ग्रुप स्टेज सामन्यातून बाहेर राहू शकतो. एका सूत्राने इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, “बुमराह त्याच्या पुनर्वसनासाठी एनसीएमध्ये जाणार आहे. मिळालेल्या प्राथमिक अहवालानुसार त्याला कोणतेही फ्रॅक्चर नाही परंतु त्याच्या पाठीला अजूनही सूज आहे.

एनसीए त्याच्या रिकव्हरीवर लक्ष ठेवणार असून तो तीन आठवडे तिथे राहील. त्यानंतर बुमराहला एक ते दोन सराव सामने खेळावे लागतील. ते झाल्यावर तो नक्की किती फिट आहे आणि आयसीसी टूर्नामेंट खेळण्यासाठी तयार आहे की नाही याबाबत माहिती मिळेल”.

रोहित शर्माच्या अनुपस्थितीत पर्थ आणि सिडनी टेस्टमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व करणारा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला त्याच्या परफॉर्मन्ससाठी प्लेअर ऑफ द सीरिजच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बुमराहने 5 सामन्यांच्या या सीरिजमध्ये तब्बल 32 विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराहने या सीरिजमध्ये त्याच्या गोलंदाजीचा जबरदस्त परफॉर्मन्स दिला. यासह त्याने भारताचे कर्णधारपद देखील सांभाळले. टेस्ट क्रिकेटच्या आयसीसी रँकिंगमध्ये बुमराह हा नंबर 1 चा गोलंदाज आहे.

हेही वाचा :

भाजपचं नवं मिशन विरोधकांचं टेन्शन वाढवणार; बावनकुळेंनी दिले सर्व मंत्र्यांना हे आदेश

‘…तर मी निवडणूक लढवणार नाही’; विधानसभेच्या तोंडावर केजरीवालांनी डाव टाकला

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! हॉल तिकीट आता…