भरधाव टेम्पोची ट्रकला धडक; काचा फोडून लोखंडी सळ्या मुलांच्या शरीरात घुसल्या
नाशिक: नाशिकमधून अंगाचा थरकाप उडवणारी बातमी समोर आली आहे. नाशिकच्या द्वारका उड्डाण पुलावर झालेल्या अपघातामुळे(accident) संपूर्ण नाशिक जिल्हाच हादरून गेला आहे. द्वारका उड्डाणपुलावर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला. तर 13 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हा दुर्दैवी अपघात मुंबई-आग्रा महामार्गावरील द्वारका उड्डाणपुलावर रात्री आठ वाजता घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, द्वारका उड्डाणपुलावर एक दुर्दैवी अपघात घडला, जिथे मुलांना घेऊन जाणाऱ्या टेम्पोने एका आयशर ट्रकला जोरदार धडक दिली. या अपघातात(accident) ट्रकमधील लोखंडी सळ्या टेम्पोच्या काचा फोडून थेट मागच्या बाजूला शिरल्या आणि त्या जागीच मुलांच्या शरीरात घुसल्या. याअपघतात सहा मुलांचा जागीच मृत्यू झाला, तर आणखी दोन मुलांचा उपचारादरम्यान सोमवारी पहाटे मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
लोखंडी सळ्यांनी भरलेला आयशर ट्रक रात्रीच्या अंधारात द्वारका उड्डाणपुलावरून जात होता. परंतु ट्रकच्या मागील भागावर लाल दिवा, कापड, किंवा इतर कोणतेही इशारे देणारे चिन्ह नव्हते. त्यामुळे टेम्पोचालकाला ट्रकच्या मागील बाजूला लोखंडी सळ्या बाहेर आल्याचे दिसले नाही. टेम्पो वेगाने धावत असल्यामुळे ट्रकला मागून जोरात धडक दिली. या धडकेमुळे ट्रकमधील लोखंडी सळ्या टेम्पोच्या आत घुसल्या आणि मागच्या बाजूला बसलेल्या मुलांच्या शरीरात शिरल्या.
अपघातात मृत्युमुखी पडलेले आणि जखमी सर्वजण सिडकोमधील सह्याद्रीनगर परिसरातील रहिवासी होते. हे सर्वजण ते निफाड तालुक्यातील धारणगाव याठिकाणी देवकार्याच्या कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम संपल्यानंतर महिला आणि पुरुष वेगवेगळ्या टेम्पोंमध्ये नाशिककडे निघाले असताना हा अपघात झाला. हा अपघात नेमका कशामुळे झाला याबाबत तपास सुरू आहे.
हेही वाचा :
ठरलं! आयपीएलचा थरार ‘या’ दिवसापासून रंगणार
एसटी कर्मचाऱ्यांसाठी सरकारचा ‘या’ प्लॅन ठरणार फायद्याचा; आता वैद्यकीय सेवेसाठी…
वारणेत साकारली तब्बल 11 एकरांत 4 लाख 50 हजार स्क्वेअर फुटांची छत्रपती शिवरायांची विश्वविक्रमी रांगोळी