खुशखबर! ही कंपनी ऑफर करतेय अनलिमिटेड इंटरनेट, ओटीटी सबस्क्रिप्शनही मिळणार!
![](https://alphabetnews.in/wp-content/uploads/2025/01/image-434-1024x576.png)
तुमच्या स्मार्टफोनमध्ये इंटरनेटच(Internet) नसेल तर स्मार्टफोन काय कामाचा? काम असो वा अभ्यास, डॉक्टरांशी बोलणे असो किंवा चित्रपट पाहणे असो, प्रत्येक कामासाठी इंटरनेटची गरज असते. इंटरनेटशिवाय आपली कामं होऊ शकच नाहीत. जर अचानक आपल्या स्मार्टफोनमधील इंटरनेट डेटा संपला तर आपण वैतागतो. कारण इंटरनेट नसेल तर आपली अनेक कामं अडकतात. तुम्हाला देखील स्मार्टफोनमधील लिमिटेड इंटरनेट संपल्यानंतर कंटाळा येतो का? तर आता तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.
![](https://alphabetnews.in/wp-content/uploads/2025/01/image-420.png)
आपल्या देशातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक असलेली Vi आता आपल्या युजर्सना अनलिमिटेड इंटरनेट डेटा ऑफर करणार आहे. यासाठी कंपनीने काही रिचार्ज प्लॅन देखील लाँच केले आहेत. Vi ने आपला युजर्सना अनलिमिटेड इंटरनेट डेटा ऑफर करण्यासाठी ‘नॉनस्टॉप हिरो’ नावाचा रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. हे असे रिचार्ज प्लॅन आहेत, ज्यामधील डेटा कधीच संपणार नाही. होय, तुम्ही ते बरोबर ऐकले. आता प्रीपेड वापरकर्ते देखील कोणत्याही अडचणीशिवाय संपूर्ण महिना अनलिमिटेड इंटरनेट(Internet) वापरू शकतात.
भारतात डेटाचा वापर झपाट्याने वाढत आहे. सेंटर फॉर डिजिटल इकॉनॉमी अँड पॉलिसी रिसर्चच्या ताज्या अहवालानुसार, गेल्या दहा वर्षांत भारतात डेटाचा वापर 288 पट वाढला आहे. TRAI च्या वार्षिक अहवालानुसार, कमी किमतीच्या स्मार्टफोन्सच्या वाढत्या वापरामुळे, देशातील इंटरनेट(internet) ग्राहकांची संख्या मार्च 2023 मध्ये 88.1 कोटींवरून मार्च 2024 मध्ये 95.4 कोटी झाली आहे. शिवाय, मार्च 2024 पर्यंत प्रति वापरकर्ता सरासरी मासिक डेटा वापर 20.27GB पर्यंत पोहोचला आहे.
Vi नॉनस्टॉप हिरो प्लॅनमध्ये डेटा, कॉलिंग, एसएमएस हे सर्व अनलिनिडेट आहेत आणि अनेक OTT प्लॅटफॉर्मवर ऑफर देखील उपलब्ध आहेत. नुकतेच OpenSignal ने म्हटले आहे की Vi चे 4G नेटवर्क भारतातील सर्वोत्तम आहे. Vi डेटा गती, व्हॉईस कॉल, गेमिंग आणि व्हिडिओ स्ट्रीमिंगच्या बाबतीत सर्वोत्तम ग्राहक अनुभव देते. आता कंपनी 5G देखील लाँच करण्याच्या तयारीत आहे.
नॉनस्टॉप हिरो प्लॅन आता आंध्र प्रदेश आणि तेलंगणा, कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये उपलब्ध होईल. या हिरो प्लॅनची सुरुवातीची किंमत केवळ 365 रुपये असणार आहे. वेगवेगळ्या ग्राहकांच्या गरजेनुसार या प्लॅनमध्ये अनेक प्रकारचे रिचार्ज पॅक आहेत आणि प्रत्येक पॅकमध्ये वेगवेगळे फायदे उपलब्ध असतील. अनेक प्लॅनमध्ये युजर्सना ओटीटी प्लॅन्सचे सबस्क्रिप्शन देखील मिळणार आहे.
![](https://alphabetnews.in/wp-content/uploads/2025/01/image-384-1024x1024.png)
Vi Hero Unlimited Pack मध्ये 365 रुपयांचा सुरुवातीचा रिचार्ज प्लॅन आहे. 365 रुपयांच्या या प्लॅनमध्ये, अनलिनिडेट डेटा, कॉल आणि 100SMS दररोज उपलब्ध आहेत. 379 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये अनलिनिडेट डेटा, कॉल आणि 100SMS दररोज उपलब्ध आहेत.
407 रुपयांच्या 28 दिवसांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये अनलिनिडेट डेटा, कॉल आणि दररोज 100SMS सह SunNXT चं सबस्क्रिप्शन देखील मिळणार आहे. 449 रुपयांच्या 28 दिवसांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये अनलिनिडेट डेटा, कॉल आणि दररोज 100SMS सह Vi Movies आणि TV सबस्क्रिप्शन ऑफर केलं जाणार आहे. 994 रुपयांच्या 84 दिवसांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये अनलिनिडेट डेटा, कॉल आणि दररोज 100 SMS सह 3 महिन्यांचे Disney+ Hotstar ऑफर केलं जाणार आहे .
हेही वाचा :
एक महिना आधीच मिळाली होती जीवे मारण्याची धमकी, संतोष देशमुखांच्या पत्नीचा महत्त्वाचा जबाब
‘आयुष्य नर्क झालं असतं जर…’, जया बच्चन यांचे अमिताभ-रेखा अफेअरवर भाष्य
विमानतळावर भारतीय क्रिकेटपटूची गैरवर्तणूक, सोशल मीडियावर व्यक्त केला संताप