हुश्श! चीनमधून दिलासादायक बातमी; HMPV परतीच्या मार्गावर…
मागील काही दिवसांपासून जगभरात HMPV विषाणूने(news) धुमाकूळ घातल्याचं दिसून आलं होतं. या विषाणूने अनेक देशांत प्रवेश केल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. अखेर चीनमधून एक दिलासादायक बातमी समोर आलीयं. चीनच्या उत्तर भागात या विषाणूचा परतीचा प्रवास सुरु झालायं. चीनच्या उत्तरेकडील भागात HMPVचे रुग्ण कमी प्रमाणात आढळून येत असल्याचं चीन आरोग्य विभागाकडून सांगितलं जात आहे.
HMPV विषाणू हा जुना विषाणू असल्याचं चीन आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलंय. चीनच्या उत्तर भागात HMPVच्या प्रकरणांमध्ये प्रमाण कमी होत असल्याचं दिसून येत असून 14 वर्षे आणि त्यापेक्षा कमी वयाच्या रुग्णांमध्ये घट होत असल्याचं पाहायला मिळत असल्याचं चीन राष्ट्रीय आरोग्य विभागाचे लिपिंग यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय.
नेदरलँड्समध्ये 2001 मध्ये प्रथम आढळलेल्या विषाणूच्या अलीकडील वर्षांमध्ये प्रकरणांमध्ये(news) वाढ झालीयं. हा जुना विषाणू असून तो अनेक दशकांपासून अस्तित्वात असल्याचं लिपिंग यांनी सांगितलंय. याआधी सोशल मीडियावर अनेक चित्रे आणि व्हिडिओ समोर आले होते, ज्यामध्ये HMPV च्या वाढत्या घटनांमुळे श्वासोच्छवासाचे आजार आणि COVID-19 सारख्या दुसऱ्या साथीच्या आजाराची भीती निर्माण झाल्यामुळे लोकांची गर्दी दिसून आली होती.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग म्हणाले की, हिवाळ्यात श्वसनाचे संक्रमण वाढत असून चीनच्या राष्ट्रीय रोग नियंत्रण आणि प्रतिबंध प्रशासनाने हिवाळ्यात चीनमध्ये श्वसनाच्या आजारांच्या घटनांची नोंद केलीयं. भारतात सुमारे 10 प्रकरणे नोंदवली गेली आहेत, बहुतेक कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात आणि आसाममधील. बहुतेक प्रकरणे 3 महिने ते 13 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये आढळतात.
दरम्यान, HMPV विषाणूमुळे सर्व वयोगटातील लोकांना श्वसनाचे आजार होऊ शकतात. लहान मुले, वृद्ध प्रौढ आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेले लोक अधिक प्रभावित होतात.
हेही वाचा :
धावत्या बाईकवर रोमान्स करणं जोडप्याला पडलं महागात; पोलिसांनी पकडले अन्…, Video
‘मला जीवे मारण्याची धमकी…’, मुख्यमंत्र्यांनी दखल घेण्याची लक्ष्मण हाकेंची मागणी
धावत्या बसमध्ये माजी आयएएस अधिकाऱ्याला मारहाण, कंडक्टरचं संतापजनक कृत्य Video