“विटामिन ईसोबत ‘हे’ पदार्थ मिक्स करा, केसांची झपाट्याने वाढ!”
![](https://alphabetnews.in/wp-content/uploads/2025/01/image-454.png)
सुंदर आणि लांबलचक केस महिलांच्या सौंदर्यात भर पडतात. पण वातावरणातील (hair growth)बदलांमुळे आणि केसांना सूट न होणाऱ्या प्रॉडक्टचा वापर केल्यामुळे केसांची गुणवत्ता पूर्णपणे खराब होऊन जाते. केसांची गुणवत्ता खराब झाल्यानंतर ती पुन्हा सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे केसांना सूट होतील अशाच प्रॉडक्टचा वापर केसांसाठी करावा. अनेक महिला, मुली केस कोरडे किंवा निस्तेज झाल्यानंतर केसांवर केमिकल ट्रीटमेंट करून घेतात. मात्र सतत केलेल्या केमिकल ट्रीटमेंटमुळे केस खराब होऊन जातात. त्यामुळे केसांच्या निरोगी वाढीसाठी केसांवर घरगुती पदार्थांचा वापर करावा. घरगुती पदार्थांचा वापर केल्यामुळे केस नैसर्गिकरित्या सुंदर आणि चमकदार होतात. शिवाय केसांची वाढ चांगली होते. केसांच्या वाढीसाठी आणि केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी केसांना विटामिन ई कॅप्सूल लावावी.
![](https://alphabetnews.in/wp-content/uploads/2025/01/image-423.png)
सांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी विटामिन ई कॅप्सूलचा वापर करावा. यामुळे केस सुंदर आणि चमकदार होण्यास मदत होईल. खराब झालेले केस पुन्हा सुधारण्यास मदत होईल. विटामिन ई कॅप्सूलचा वापर केसांसह त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी सुद्धा केला जातो. पण चुकीच्या पद्धतीने विटामिन ई (hair growth)कॅप्सूलचा वापर केल्यास केसांमध्ये कोणताच फरक दिसून येणार नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कोणत्या पदार्थांमध्ये विटामिन ई मिक्स करून केसांना लावावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
खोबरेल तेल:
केसांच्या वाढीसाठी खोबरेल तेल अतिशय प्रभावी आहे. खोबरेल तेलाचा वापर केल्यामुळे केसांची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल. शिवाय केस लांबलचक होण्यास मदत होते. यासाठी खोबरेल तेलात विटामिन ई कॅप्सूल मिक्स करून लावल्यास केस सुंदर आणि चमकदार दिसतील. केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल. तयार केलेल्या तेलाचा वापर केसांच्या मुळांना मसाज करण्यासाठी करावा. यामुळे केसांची मूळ मजबूत होतील.
दही:
केसांच्या वाढीसाठी आणि सुंदर केसांसाठी दही वापरल्यास केस सुंदर आणि चमकदार होतील. यासाठी २ चमचे दही घेऊन त्यात विटामिन ई कॅप्सूल मिक्स करावी. जेल सारखे(hair growth) मिश्रण तयार झाल्यानंतर संपूर्ण केसांच्या मुळांवर मिश्रण लावून केसांना हलक्या हाताने मसाज करावा. यामुळे केस मऊ आणि मजबूत होतील. दही केसांच्या वाढीसाठी अतिशय महत्व आहे.
![](https://alphabetnews.in/wp-content/uploads/2025/01/image-384-1024x1024.png)
रफड जेल:
कोरफड जेलचा वापर त्वचेसह केसांच्या वाढीसाठी सुद्धा केला जात आहे. यामध्ये असलेले गुणधर्म केस सुंदर आणि चमकदार ठेवण्यासाठी मदत करतात. यासाठी कोरफड जेलमध्ये विटामिन ई कॅप्सूल मिक्स करून मिश्रण तयार करा. तयार केलेले मिश्रण संपूर्ण केसांवर लावून काहीवेळ ठेवून नंतर केस पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे केसांची वाढ निरोगी होईल आणि केस सुंदर दिसतील.
हेही वाचा :
‘असुरन’ नंतर वेत्रीमारन आणि धनुष आले एकत्र, चित्रपटासाठी केली हातमिळवणी!
‘भूल भुलैया २’ नंतर या हॉरर कॉमेडी चित्रपटात दिसणार तब्बू, पुन्हा साकारणार लक्षवेधी भूमिका!
हिवाळ्यात गॅस्ट्रोइंटेस्टाइनल संसर्गाचा धोका; जाणून घ्या लक्षणे आणि त्यावरील उपाय