बसवर दगडफेक, समर्थकांचा राडा; वाल्मिक कराडवर मकोका दाखल होताच परळीत वातावरण तापलं
बीड: संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणात केज कोर्टाने आरोपी वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी(Judicial custody) सुनावली. त्यासोबतच त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मकोका) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. कराडवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर परळीतील वातावरण तापलं आहे.
बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मीक कराडला केज कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी(Judicial custody) सुनावली आहे. याधी केज कोर्टाने वाल्मीक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली होती. आज वाल्मीक कराडची सीआयडी कोठडी संपली होती. त्यामुळे आज वाल्मीक कराडला पुन्हा केज कोर्टात हजर करण्यात आले होते. याशिवाय कराडवर मकोका लावण्यात आला आहे.
बीड जिल्ह्यात संतोष देशमुख प्रकरणाने मोठे वळण घेतले असून, वाल्मिक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच त्याच्यावर कठोर कारवाई म्हणून मकोका (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) लावण्यात आला आहे. या निर्णयानंतर परळी शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
वाल्मिक कराड समर्थकांनी सकाळपासून आक्रमक भूमिका घेतली असून, परळी शहरात अचानक बंदची हाक देण्यात आली आहे. काही भागांमध्ये बसवर दगडफेक करण्यात आली असून, यामुळे परिस्थिती आणखीनच बिघडली आहे. शहरात तणावपूर्ण वातावरण असून, पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
परळीत कराड समर्थकांनी सकाळपासून निदर्शने सुरू केली आहेत. संतापलेल्या समर्थकांनी टायर पेटवून आपला रोष व्यक्त केला आहे. याचदरम्यान, एका महिलेने स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्याने वातावरण अधिकच तापले. कराडच्या ७५ वर्षीय आई आणि पत्नीनेही या निदर्शनांमध्ये भाग घेतला आहे.
कराड समर्थकांनी परळीत आमदार सुरेश धस आणि संदीप क्षीरसागर यांच्या विरोधात रोष व्यक्त केला. त्यांच्या पोस्टरवर चप्पल मारत निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच काही ठिकाणी टायर पेटवण्याचे प्रकार घडले असून, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने टायर विझवले.
बीड जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू असतानाही आंदोलने सुरू असल्याचे दिसत आहे. परिस्थिती अधिक बिघडू नये म्हणून पोलिसांनी उपाययोजना केल्या आहेत. प्रशासनाकडून नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.संतोष देशमुख प्रकरणाचा वाद चिघळत चालल्यामुळे प्रशासन सतर्क आहे. परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांनी व्यापक बंदोबस्त ठेवला आहे. परळीत वातावरण शांत ठेवण्यासाठी उपाययोजनांवर भर दिला जात आहे.
हेही वाचा :
वाल्मिक कराडवर मोक्का अन् 10 मिनिटांत परळी बंद!
राज्यामध्ये सुरु आहे जातीपातींचं राजकारण? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नवी कार घेण्यासाठी बॉडिकॉन ड्रेसमध्ये पोहोचली माधुरी दीक्षित Video