सुसाट कंटेनरने तब्बल ‘इतक्या’ जणांना उडवले!
आजकाल अपघाताच्या घटना वारंवार घडत आहेत. अशातच आज पुण्याजवळील चाकण शिक्रापूर रोडवर एक भीषण अपघाताचा थरार घडला आहे. यावेळी एका सुसाट कंटेनरने(container) अनेक वाहनांना धडक दिल्याची घटना घडली आहे. या घटनेत कंटेनरने तब्बल 10 ते 15 जणांना उडवले आहे. मात्र यामध्ये एक जणाचा मृत्यू झाला आहे. तसेच या अपघातातील अनेक जण गंभीर जखमी आहेत.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, चाकण शिक्रापूर रोडवर आज भीषण अपघात झाला आहे. यावेळी चाकणकडून शिक्रापूरच्या दिशेने येणार कंटेनर(container) सुसाट निघाला. मात्र यावेळी या कंटेनरने रस्त्यात येणाऱ्या अनेक वाहनांना धडक देत पुढे गेला.
यावेळी चाकण शिक्रापूर रोडवर सुरु असलेल्या या अपघाताची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. मात्र त्यानंतर पोलिसांनी देखील कंटेनरचा पाठलाग सुरु केला. त्यानंतर पोलिसांनी कंटेनरचा पाठलाग करतानाचा थरार कॅमेरात कैद केला झाला असून तो प्रचंड व्हायरल झाला आहे.
मात्र या घटनेत चाकणमधील माणिक चौकात कंटेनर चालकाने तीन महिलांना उडवल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर पळून जाण्याच्या हेतूने कंटेनर चालक भरधाव वेगात निघाला. मात्र वेळीच पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरु केला. त्यानंतरही चालकाने इतर वाहनांना धक्का दिला.
चाकण, शेलगाव, रासे, पिंपळगाव आणि चौफुला परिसरात कंटेनर चालकाने हा अपघात केला आहे. मात्र त्यानंतर कंटेनर चालकाला शिक्रापूर हद्दीत नागरिकांनी अडवून चांगलाच चोप दिला आहे. तसेच शिक्रापूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
मात्र या धक्कादायक घटनेत शेलपिंपळगाव येथे या कंटेनरने एका ट्रक व कारला उडवले. तसेच या कंटेनरने चाकण येथे एका मुलीला देखील धडक दिली आहे. यामध्ये ती गंभीर जखमी झाली आहे. संतापजनक बाब म्हणजे सुमारे 10 ते 15 जणांना या कंटेनरने उडवले आहे. तर त्यामध्ये एका जणाचा मृत्यू देखील झाला आहे. तर अनेकजण जखमी आहेत.
हेही वाचा :
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; भरधाव बस ट्रकला धडकली, एकाचा मृत्यू तर 10 जण जखमी
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी
पती-पत्नी और वो! नाग-नागिणीमध्ये अडकला मूंगूस, मग जे घडलं…Video Viral