1 चेंडूवर 286 धावा…! सामन्यामध्ये आणली बंदूक आणि कुऱ्हाड

क्रिकेटच्या खेळात कधीही काहीही होऊ शकते. अगदी शेवटपर्यंत या सामन्यांमध्ये(match) काय होईल याबद्दल कोणी काही सांगू शकत नाही. यामध्ये अनेक विक्रमही होतात. 6 चेंडूत 6 षटकार किंवा एका षटकात 4 विकेट अशा विक्रमांवर विश्वास ठेवता येतो. पण दोन फलंदाजांनी केवळ एका चेंडूत 286 धावा केल्या असे म्हटल्यास हे एखाद्या काल्पनिक कथेपेक्षा कमी वाटणार नाही. पण ही एक सत्य घटना आहे. होय तुम्ही नीट वाचलं, एका चेंडूवर 286 धावा केल्या आहेत.

हे क्रिकेटमधले सर्वात मोठे आश्चर्य म्हटले तर वावगे ठरणार नाही. 130 वर्षांपूर्वी घडलेल्या या पराक्रमावर आजही विश्वास ठेवणे कठीण आहे. एवढंच नाही तर सामन्याच्या(match) दरम्यान बंदूक आणि कुऱ्हाड घ्यावी लागली होती.

ही घटना 1894 साली वेस्टर्न ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया आणि स्क्रॅच-XI या सामन्यात घडली होती. क्रिकेटच्या विश्वसनीय वेबसाइट ईएसपीएन क्रिकइन्फोनेही या विक्रमाची सविस्तर चर्चा केली आहे. रिपोर्टनुसार, एका वृत्तपत्रात या घटनेचा उल्लेख करण्यात आला आहे. जेव्हा फक्त दोन फलंदाजांनी मिळून एका चेंडूवर 286 धावा केल्या. धावा मोजताना पंचांचाही गोंधळ उडाला होता.

व्हिक्टोरियाचा संघ फलंदाजी करत होता. संघाच्या एका फलंदाजाने शानदार शॉट खेळला आणि बॉल झाडाला लटकला. त्यानंतर फलंदाजांनी रन्स काढायला सुरू केली. चेंडू हरवल्यामुळे फिल्डिंग करणाऱ्या संघाने पंचांना स्कोअरकार्ड थांबवण्याचे आवाहनही केले. पण फलंदाजांनी चेंडू दिसत असल्याचे सांगून अपील फेटाळले. फलंदाजांनी सुमारे 6 किमी धावून धावफलकावर 286 धावा केल्या.

अहवालानुसार, फिल्डिंग करणाऱ्या संघाने चेंडू खाली येण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले होते. पण चेंडू खाली आला नाही, त्यानंतर मैदानावर कुऱ्हाड आणण्यास सांगण्यात आले जेणेकरून त्याने झाड कापून चेंडू खाली घेता येऊ शकेल.पण कुऱ्हाड सापडली नाही, त्यानंतर रायफल मागवण्यात आली आणि चेंडूला लक्ष्य करून खाली पाडण्यात आले. तोपर्यंत फलंदाजांच्या 286 धावा झाल्या होत्या.

हेही वाचा :

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी

सुसाट कंटेनरने तब्बल ‘इतक्या’ जणांना उडवले!

पती-पत्नी और वो! नाग-नागिणीमध्ये अडकला मूंगूस, मग जे घडलं…Video Viral