SBI च्या करोडो ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी!

भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना (SBI customers) एका नवीन सायबर फसवणुकीबाबत सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सरकारचे प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो म्हणजेच पीआयबीने नुकताच एक इशारा जारी केला असून, ग्राहकांना बनावट ‘एसबीआय रिवॉर्ड्स’ अॅपपासून सावध राहण्यास सांगितले आहे. या फसवणुकीत ग्राहकांना एक बनावट अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले जाते, ज्यामुळे त्यांची बँक खाती रिकामी होऊ शकतात.

या घोटाळ्यात, सायबर गुन्हेगार ग्राहकांना(SBI customers) एक बनावट मेसेज पाठवतात. या मेसेजमध्ये, ग्राहकांचे एसबीआय नेट बँकिंग रिवॉर्ड पॉईंट्स लवकरच संपणार आहेत, असे भासवले जाते. या मेसेजमध्ये एक लिंक असते. या लिंकवर क्लिक केल्यास, ग्राहकांना ‘एसबीआय रिवॉर्ड्स’ नावाचे एक अॅप इन्स्टॉल करण्यास सांगितले जाते. या अॅपचे नाव अनेकदा “SBI REWARD27.APK” असे असते.

एपीके म्हणजे अँड्रॉइड पॅकेज किट. अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीमवर अॅप इन्स्टॉल करण्यासाठी एपीके फाइल्सचा वापर केला जातो. सहसा, सुरक्षित अॅप्स हे गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड केले जातात. परंतु, तृतीय-पक्ष स्त्रोतांमधून डाउनलोड केलेल्या एपीके फाइल्स धोकादायक ठरू शकतात. अशा फाइल्समध्ये व्हायरस किंवा मालवेअर असू शकतात. या व्हायरस किंवा मालवेअरच्या मदतीने सायबर गुन्हेगार तुमच्या फोनचा ताबा घेऊ शकतात.

ग्राहकांची दिशाभूल करण्यासाठी, फसवणूक करणारे बनावट एपीके फाइल्स इन्स्टॉल करण्याचे आमिष दाखवतात. एकदा का ग्राहकांनी ही फाइल इन्स्टॉल केली की, हे अॅप कॅमेरा, मायक्रोफोन, लोकेशन, कॉन्टॅक्ट्स आणि एसएमएस अशा अनेक परवानग्यांची मागणी करते. ग्राहकांनी या सर्व परवानग्या दिल्यानंतर, हॅकर्सना त्यांच्या डिव्हाइसवर पूर्ण नियंत्रण मिळते. अशा प्रकारे, हॅकर्स पासवर्ड आणि ओटीपी यांसारख्या संवेदनशील डेटासह तुमची बँकिंगशी संबंधित सर्व माहिती चोरू शकतात आणि नंतर तुमच्या बँक खात्यातून पैसे चोरू शकतात.

हेही वाचा :

हवामानात मोठा बदल होणार, IMD ने दिली महत्त्वाची माहिती

‘मी खूप रडले….’; ‘त्या’ व्हायरल किसींग सीनबाबत प्रिया बापट पहिल्यांदाच बोलली

रिलायंस जियोचं 49 करोड युजर्ससाठी खास गिफ्ट, आत्ताच घ्या सुवर्णसंधीचा फायदा