भारताचा बेस्ट फिनिशर रिंकू सिंग लवकरच अडकणार लग्नबंधनात
भारताचा बेस्ट फिनिशर(sports news) रिंकू सिंग लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. उत्तर प्रदेशच्या युवा खासदार प्रिया सरोज हिच्याशी नुकताच साखरपुडा पार पडल्याची माहिती आहे. उत्तर प्रदेशच्या मछली शहरातून मोठ्या भाजप उमेदवार बीपी सरोज यांचा पराभव करीत खासदार बनली होती. अवघ्या 25 व्या वर्षी खासदार होण्याचा विक्रम तिने केला आहे. तिचे वडील सुद्धा तीन वेळा खासदार झाले आहेत.
उत्तर प्रदेशातील मच्छलीशहर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रिया सरोज हिचे अखिलेश यादव यांच्या टीममधील(sports news) तरुण खासदाराच्या युक्तिवादाचे आणि वृत्तीचेही खूप कौतुक केले जाते. ती सतत विविध मुद्द्यांवर तिचे ठाम मत व्यक्त करत असते. अनेक वेळा तिने संसदेत भाजपला कोंडीत पकडले आहे. संविधान निर्माते बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर प्रिया सरोज यांच्या निषेधाचीही मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती.
प्रिया सरोज यांनी समाजवादी पक्षाच्या खासदारांसह भाजपाविरोधी निदर्शनात भाग घेतला. ती संसद भवनात डॉ. आंबेडकरांच्या फोटोसह दिसली. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव मागास दलित अल्पसंख्याक म्हणजेच पीडीए राजकारण पुढे नेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. प्रिया सरोज तिच्या वडिलांच्या तूफानी सरोज यांच्या मागास-दलित समाजाच्या राजकारणाला पुढे नेण्याचा प्रयत्न करताना दिसते.
प्रिया सरोज या सर्वोच्च न्यायालयात वकील आहेत. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. तिचा जन्म २३ नोव्हेंबर १९९८ रोजी झाला. वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी, त्या भाजपच्या शक्तिशाली नेते बीपी सरोज यांना पराभूत करून लोकसभेत पोहोचण्यात यशस्वी झाल्या. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत अखिलेश यादव यांनी या तरुण चेहऱ्याला संधी दिली होती. परंतु, त्यांनी दिलेल्या संधीचे प्रिया सरोजने सोने केले.
प्रिया सरोज ही समाजवादी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक असलेल्या तूफानी सरोज यांची मुलगी आहे. तुफानी सरोज या मछलीशहर लोकसभा मतदारसंघातून विजयाची हॅट्रिक करणाऱ्या खासदार आहेत. १९९९, २००४ आणि २००९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी सपाच्या तिकिटावर मच्छलीशहर लोकसभा मतदारसंघ जिंकला.
२०१४ च्या मोदी लाटेत तूफानी सरोज यांना पराभवाचा सामना करावा लागला. या निवडणुकीत भाजपचे राम चरित्र निषाद यांनी बसपाचे बीपी सरोज यांचा १,७२,१५५ मतांनी पराभव केला. या निवडणुकीत तूफानी सरोज तिसऱ्या स्थानावर घसरल्या.
भाजपचे ज्येष्ठ नेते बीपी सरोज यांचा पराभव करून प्रिया सरोज यांनी लोकसभेत प्रवेश केला. प्रिया सरोज यांचे वडील तूफानी सरोज हे देखील मछलीशहर लोकसभा मतदारसंघातून तीन वेळा खासदार राहिले आहेत. त्यांनी १९९९, २००४ आणि २००९ मध्ये लोकसभा निवडणूक जिंकली. यानंतर, त्यांची मुलगी प्रिया सरोज यांनी मच्छलीशहरचे प्रतिनिधित्व केले आणि ती देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात तरुण खासदारांपैकी एक आहे.
हेही वाचा :
14 दिवस मध खाल्ल्यास होतील ‘हे’ आश्चर्यकारक बदल
आधार कार्डवर मिळतं 2 लाखांचं कर्ज; जाणून घ्या संपूर्ण माहिती…
महिलांना मिळणार दरमहा 2500 रुपये अन् मोफत वीज-पाणी, भाजपकडून मोठी घोषणा