कपिल शर्मासह राजपाल यादव, रेमो डिसूझा आणि सुगंधा मिश्रा यांना मिळाली जीवे मारण्याची धमकी
१६ जानेवारी २०२५ रोजी सैफ अली खानवर त्याच्याच घरात हल्ला झाला ज्यामध्ये तो जखमी झाला. तथापि, आता तो बरा आहे आणि त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. पण याच दरम्यान आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे की प्रसिद्ध विनोदी कलाकार कपिल शर्मा यांना जीवे मारण्याची धमकी(threats) मिळाली आहे. या प्रकरणात पोलीस सतर्क झाले आहेत आणि त्यांनी तपास सुरू केला आहे.
कपिल व्यतिरिक्त सुगंधा मिश्रा, राजपाल यादव आणि रेमो डिसूझा यांनाही धमकीचे ईमेल आले आहेत ही बातमी समोर आल्यानंतर मनोरंजन विश्वात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकरणाबद्दल सविस्तरपणे आपण जाणून घेणार आहोत.
प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा यांना बुधवार, २२ जानेवारी २०२५ रोजी जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. विनोदी कलाकाराला ईमेलद्वारे ही धमकी(threats) देण्यात आली आहे. आता पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे. या बातमीमुळे कपिल शर्माच्या चाहत्यांची चिंता वाढली आहे. तसेच हा बातमीने मनोरंजन विश्वात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
केवळ कपिल शर्मालाच नाही तर त्याच्या कुटुंबाला, नातेवाईकांना आणि शेजाऱ्यांनाही जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. तसेच त्यांनाही ईमेलद्वारे धमक्या मिळाल्या आहेत. मुंबईतील अंबोली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे आणि अज्ञात व्यक्तींविरुद्ध सीआरपीसीच्या कलम ३५१(३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे एक हाय प्रोफाइल प्रकरण आहे आणि अलिकडेच सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर पोलिसही ॲक्शन मोडमध्ये आहेत.
कपिल शर्माला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. परंतु आतापर्यंत विनोदी कलाकार किंवा त्याच्या नातेवाईकांकडून अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. फक्त एवढीच बातमी समोर आली आहे की धमकी देणाऱ्या ईमेलचा आयपी ॲड्रेस पाकिस्तानचा आहे. तसेच या बातमीने आता सर्वत्र खळबळ उडाली आहे. चाहत्यांच्या मनात देखील अनेक प्रश्न निर्माण होत आहे. या सर्व प्रकरणाचा पोलीस शोध घेत आहेत.
अभिनेता कपिल व्यतिरिक्त, नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझा, कॉमेडियन राजपाल यादव आणि अभिनेत्री सुगंधा मिश्रा यांसारख्या प्रसिद्ध सेलिब्रिटींनाही जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. ही बातमी समोर आल्यापासून इंडस्ट्रीत खळबळ उडाली आहे. या सेलिब्रिटींना पाकिस्तानी ईमेल आयडीवरून धमक्याही आल्या आहेत. या सगळ्या प्रकरणाचा शोध पोलीस लवकरात लवकर घेतील अशी आशा आहे.
हेही वाचा :
‘छावा’ नंतर सिनेक्षेत्रातून संन्यास घेणार रश्मिका?
पुढील काही तास महत्त्वाचे… राज्यातील हवामान बदलांनी वाढवली चिंता…
महाराष्ट्रात ‘ऑपरेशन धनुष्यबाण’? अमित शाहांचा दौरा, ठाकरेंचे खासदार शिवबंधन सोडण्याच्या चर्चा