फ्रीमध्ये OTT सबस्क्रिप्शन मिळवण्याची संधी! Flipkart करणार तुमची मद

ई कॉमर्स फ्लिपकार्ट त्यांच्या ग्राहकांना नेहमीच डिस्काऊंट आणि ऑफर्ससह खरेदी करण्याची संधी देत असतो. ज्यामुळे ग्राहक पैशांची बचत करून मनसोक्त खरेदी करू शकतात. काही दिवसांपूर्वीच फ्लिपकार्टवर 26 जानेवारनिमित्त सेल देखील सुरु करण्यात आला आहे. या सेलमध्ये तुम्ही सर्व खरेदीवर भरगोस डिस्काऊंट मिळवू शकता. ऑफर्स आणि डिस्काऊंटसह आता तुम्हाला फ्लिपकार्टवर ओटीटी सबस्क्रिप्शन(subscription) देखील मिळणार आहे आणि विशेष म्हणजे तुम्हाला हे ओटीटी सबस्क्रिप्शन खरेदी करण्याची गरज नाही, कारण ते तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे. पण यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत.

ओटीटी प्लॅटफॉर्मवर दररोज नवीन व्हिडिओ कंटेट रिलीज केली जात आहे, परंतु बजेटचा मुद्दा असा आहे की अनावश्यक पैसे खर्च करण्यापूर्वी विचार करणे आवश्यक आहे, परंतु जर ओटीटी सदस्यता विनामूल्य मिळाली तर? ओटीटी प्लॅटफॉर्मवरील व्हिडीओ कंटेट पाहणं प्रत्येकाला आवडतं.

पण महागड्या सबस्क्रिप्शनमुळे(subscription) अनेकजण ओटीटी प्लॅटफॉर्म सबस्क्रिप्शन खरेदी करत नाही. पण आता तुम्हाला ओटीटी सबस्क्रिप्शन मोफत घेण्याची संधी मिळणार आहे. यासाठी तुम्हाला फ्लिपकार्टवर सुपरकॉइन गोळा करायचे आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही फ्रीमध्ये ओटीटी सबस्क्रिप्शनचा आनंद घेऊ शकणार आहात.

फ्लिपकार्टच्या Supercoin चा वापर करून तुम्ही मोफत ओटीटी सबस्क्रिप्शन कसे मिळवू शकता ते आम्ही तुम्हाला आता सांगणार आहोत. यासाठी तुम्हाला फक्त काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. फ्लिपकार्टच्या सुपरकॉइन रिवॉर्ड सिस्टमचा वापर करून, तुम्ही कोणत्याही खर्चाशिवाय किंवा सवलतीच्या दरात ओटीटी सदस्यत्व मिळवू शकता.

फ्लिपकार्टवर मोफत ओटीटी सबस्क्रिप्शन मिळवण्यासाठी प्रथम फ्लिपकार्ट ॲप किंवा वेबसाइटवर जा. येथे तुम्हाला SuperCoin चा पर्याय दिसेल, त्यावर टॅप करा येथे तुम्हाला एकूण नाणी दिसतील. ज्याच्या आधारे तुमचं ओटीटी सबस्क्रिप्शन ठरवलं जाणार आहे. यानंतर गेट फ्री ओटीटी सबस्क्रिप्शन(subscription) लिहिलेले बॅनर निवडा. येथे तुम्हाला Sony LIV, Zee5, Times Prime Premium Pack, OTT Play with Gaana सारख्या अनेक ओटीटी प्लॅटफॉर्मचा पर्याय मिळेल. येथे तुम्ही SuperCoins वापरून काही ओटीटी सदस्यता विनामूल्य मिळवू शकता, परंतु काही ओटीटी ॲप्ससाठी तुम्हाला सदस्यता शुल्काचा काही भाग भरावा लागेल.

यानंतर इच्छित ओटीटी सबस्क्रिप्शन निवडा. युज कॉइन पर्याय निवडल्यानंतर एक कूपन कोड तयार होईल आणि तुमच्या फ्लिपकार्ट खात्याच्या ‘माई रिवॉर्ड्स’ विभागात सेव्ह केला जाईल. निवडलेल्या ओटीटी ॲपच्या वेबसाइटवर जा आणि तुमच्या मोबाइल नंबरने साइन इन करा. यानंतर, मेगा मेनूवर जाऊन ऑफर सक्रिय करा आणि कूपन कोड प्रविष्ट करा. यानंतर तुमचं ओटीटी सबस्क्रिप्शन सुरु होणार आहे आणि तुम्ही ओटीटीवरील व्हिडीओ कंटेटचा आनंद घेऊ शकाल.

हेही वाचा :

बांगलादेशी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ! 

रोहित शर्माची साडेसाती संपेना! 9 वर्षानंतर रणजी ट्रॉफीत खेळायला उतरला पण….

“बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्या…”; जयंतीनिमित्त शिवसेनेची मोदी सरकारकडे मोठी मागणी