AAP आमदाराचा मुलगा आहे म्हणत दुचाकीस्वाराने पोलिसांना दिली धमकी, मग पुढे जे घडलं… Video Viral

दिल्लीत विधानसभा निवडणुकीची उत्सुकता जोरात सुरू आहे. राष्ट्रीय राजधानीतील सर्व 70 जागांवर एकाच टप्प्यात 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून निकाल 8 फेब्रुवारीला जाहीर होणार आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला आहे. या सगळ्या दरम्यान आता एक अनोखा व्हिडिओ(video) सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात पोलिसांनी एका आमदाराच्या मुलाला पकडताच त्याने भररस्त्यात पोलिसांना धमकी दिल्याचे दिसून आले. हा सर्व प्रकार तेथील एका व्यक्तीने आपल्या कॅमेरात कैद केला आणि आता याचाच व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. नक्की काय घडलं ते जाणून घेऊयात.

तर झालं असं की, गस्तीदरम्यान दिल्ली पोलिसांनी बुलेटवर स्वार असलेल्या दोन मुलांना चुकीच्या बाजूने दुचाकी चालवल्याबद्दल अडवले. बुलेटला सुधारित सायलेन्सर बसवण्यात आले होते, जो मोठा आवाज करत होता. एवढंच नाही तर तो बेधडकपणे दुचाकी चालवत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जामिया नगरचे एएसआय आणि एसएचओ आपल्या कर्मचाऱ्यांसह गस्त घालत होते.

गस्तीदरम्यान ते बाटला हाऊसमधील नफीस रोडवर आले असता त्यांना बुलेटवर स्वार असलेली दोन मुले चुकीच्या बाजूने येताना दिसली. तो बुलेटच्या बदललेल्या सायलेन्सरमधून मोठा आवाज करत होता. एवढंच नाही तर तो बेधडकपणे दुचाकी चालवत होता. पोलिसांनी त्याला थांबवून त्याचा परवाना आणि आरसी मागितली, पण तो दाखवू शकला नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान बाईक चालवणाऱ्या मुलाने स्वतःला आम आदमी पार्टीचे (आप) आमदार अमानतुल्ला खान यांचा मुलगा असल्याचे उघड केले आणि म्हटले, तुम्ही चलान कसे कापू शकता? त्याने पोलिसांशी गैरवर्तन केले आणि आपण ‘आप’च्या आमदाराचा मुलगा असल्याने पोलिस असे करत असल्याचा आरोप केला. पोलिसांनी त्याला त्याचा ड्रायव्हिंग लायसन्स आणि ओळखपत्र विचारले असता त्याने त्याची गरज नसल्याचे सांगितले. एका मुलाने अमानतुल्ला खानला फोन केला आणि त्याला एसएचओशी बोलायला लावले(video). नंतर या मुलांनी आपले नाव आणि पत्ता न सांगता दुचाकी सोडून तेथून पळ काढला.

यानंतर ASI त्यांची बुलेट पोलीस ठाण्यात आणली. पोलिसांनी मॉडिफाइड सायलेन्सरने वाहन चालवणे, हेल्मेट, लायसन्स आणि आरसीशिवाय दुचाकी चालवणे तसेच चुकीच्या पद्धतीने वाहन चालवणे या प्रकरणी गुन्हा दाखल केला. त्यांच्या दुचाकीला बाईक संबंधित कलमांतर्गत जप्त करण्यात आले आहे.

AAP आमदार अमानतुल्ला खान यांचा मुलगा असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांशी गैरवर्तन करणे, धोकादायक वाहन चालवणे, हेल्मेटशिवाय वाहन चालवणे, बदललेले सायलेन्सर वापरणे आणि ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय वाहन चालवणे या आरोपाखाली 20,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

दरम्यान या घटनेचा व्हायरल व्हिडिओ @journomitalli1 नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेविषयीची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. व्हिडिओला आतापर्यंत अनेकांनी पाहिले असून आता हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

हेही वाचा :

महाकुंभातील अघोरी बाबा कालपुरुष साधूंची भीतीदायक भविष्यवाणी!

“महाराष्ट्रात सत्तेचा नवा फॉर्म्युला: ‘दीड-दीड-दीड’चा राजकीय प्रयोग”

मोठी बातमी : इअरफोनमुळे आवाज आला नाही, ट्रेनच्या धडकेत तरुणीचा मृत्यू