अमूलने देशभरात दुधाच्या किमतीत केली कपात, प्रति लीटर 1 रूपया होणार कमी
आतापर्यंत दुधाच्या किमतीत(milk prices) वाढ झाल्याच्या बातम्या बऱ्याच काळापासून येत आहेत. पण आता देशातील सर्वात मोठा डेअरी ब्रँड अमूलने दुधाच्या किमती कमी केल्या आहेत, ज्यामुळे महागाईपासून दिलासा मिळाला आहे. अमूलने गुजरातमध्ये दुधाचे दर कमी केले आहेत. सध्या अमूलने अमूल गोल्ड, अमूल ताजा आणि टी स्पेशल दुधाच्या किमती कमी केल्या आहेतगेल्या अनेक वर्षांपासून दूध महाग होत असल्याच्या बातम्या सतत येत आहेत, परंतु आज (२४ जानेवारी २०२५) दूध स्वस्त झाल्याची बातमी ग्राहकांना निश्चितच दिलासा देणारी ठरेल.
अमूलचे दूध (milk prices)स्वस्त झाल्याचा परिणाम इतर डेअरी कंपन्यांवरही होईल आणि त्यांनाही दुधाचे दर कमी करावे लागतील अशी अपेक्षा आहे. अमूल गोल्ड, अमूल ताजा आणि अमूल टी स्पेशलच्या १ लिटर पाउचची किंमत १ रुपयांनी कमी करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमूल डेअरीने अमूल गोल्ड, अमूल फ्रेश आणि टी स्पेशल या तीन दुग्धजन्य पदार्थांच्या किमती प्रति लिटर १ रुपयांनी कमी केल्या आहेत. अमूल गोल्डचे एक लिटर पॅकेट आता ६६ रुपयांऐवजी ६५ रुपयांना उपलब्ध होईल. तर अमूलचे ताजे दूध आता ५४ रुपयांऐवजी ५३ रुपयांना खरेदी करता येईल. तर अमूल टी स्पेशल दुधाचा एक लिटरचा पाउच ६२ रुपयांऐवजी ६१ रुपयांना खरेदी करता येईल.
गेल्या वर्षी जूनमध्येच अमूलने दुधाच्या किमतीत प्रति लिटर २ रुपयांची वाढ केली होती. या वाढीनंतर, अमूल गोल्डच्या ५०० मिली पॅकची किंमत ३२ ते ३३ रुपये झाली. तर एक लिटर अमूल गोल्डची किंमत ६४ रुपयांवरून ६६ रुपये प्रति लिटर झाली. तर अमूल ताजाच्या अर्ध्या लिटर पॅकसाठी ग्राहकांना २६ रुपयांऐवजी २७ रुपये मोजावे लागत होते. त्याच वेळी, अमूल शक्तीच्या अर्ध्या लिटर पॅकेटची किंमत २९ रुपयांवरून ३० रुपये झाली. ३ जूनपासून देशभरात दुधाचे दर वाढले होते.
दुधाच्या किमती वाढल्यानंतर अमूलने पहिल्यांदाच अशी कपात केली आहे. कंपनीने या निर्णयामागील कारणांबद्दल कोणतीही सविस्तर माहिती दिलेली नसली तरी, ग्राहकांना दिलासा देण्यासाठी आणि बाजारपेठेतील स्पर्धा लक्षात घेऊन हे पाऊल उचलले असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. दुधाच्या किमतीतील या कपातीमुळे सामान्य ग्राहकांना, विशेषतः जे दैनंदिन वापरासाठी अमूलच्या या उत्पादनांवर अवलंबून आहेत, त्यांना दिलासा मिळेल.
हेही वाचा :
विकी कौशलचा ‘छावा’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात!
AAP आमदाराचा मुलगा आहे म्हणत दुचाकीस्वाराने पोलिसांना दिली धमकी, मग पुढे जे घडलं… Video Viral
नितीश कुमार भाजपचा पाठींबा काढणार? शरद पवारांनी दिली प्रतिक्रीया