ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; ‘NPCL’चे उद्यापासून नवे नियम
आता १ फेब्रुवारी २०२५ नंतर यूपीआय आयडी काही महत्वाचे बदल करत आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ने काही दिवसांपूर्वी आपल्या नियामांमध्ये मोठा बदल केला आहे. या बदलानुसार आता यूपीआय आयडीमध्ये कोणतेही स्पेशल कॅरेक्टर देता येणार नाही. यूपीआय आयडी किंवा ट्रांजेक्शन आयडीमध्ये स्पेशल कॅरेक्टर्स असतील (@, !, किंवा #) तर ते पेमेंट(online payment) फेल होईल.
गेल्या ९ जानेवारी रोजी एनपीसीएलने एक सर्कुलर जारी केले होते, ज्यामध्ये नव्या नियमांबद्दल माहिती देण्यात आली होती. यामध्ये स्पष्ट करण्यात आले होते की यूपीआय ट्रांजेक्शन आयडी फक्त अल्टान्यूमेरिक असू शकतो. म्हणजेच त्यामध्ये फक्त क्रमांक आणि अक्षरे असतील आणि कोणतेही स्पेशल कॅरेक्टर देण्यात आलेले नसेल. जर ट्राजेक्शन आयडीमध्ये स्पेशल कॅरेक्टर असेल तर सिस्टम आपोआप पेमेंट(online payment) रिजेक्ट करेल.
मोठे पेमेंट अॅप्स हे आपोआप यूपीआय आयडी तयार करून देतात, पण वापरकर्त्यांना कस्टम यूपीआय आयडी किंवा सध्याच्या आयडीमध्ये बदल करण्याता पर्याय मिळतो. जर तुमच्या सध्याच्या यूपीआय आयडीमध्ये कोणतेही स्पेशल कॅरेक्टर असेल तर त्याला एडिट करण्याचा पर्याय देखील मिळेल, त्यामुळे तुम्ही त्यामधील स्पेशल कॅरेक्टर्स काढून टाकू शकता. याखेरीज काही ठराविक पेमेंट्स अॅप्स आपोआप तुमच्या सध्याच्या आयडीमध्ये बदल करतील.
सोप्या शब्दात सांगायचे झाले तर जर तुमचा फोन नंबर ९९९८८८७७७२२२१११ असा काही तरी आहे आणि तुमची बँक HDFC बँक असेल, तर पेमेंट ॲप्स आपोआप तुमचे UPI आयडी तयार करतात. जसे की, ९९९८८८७७७२२२१११@okhdfcbank हा तुमचा आयडी असू शकतो. पण आता याद्वारे पेमेंट करता येणार नाही आणि फक्त ९९९८८८७७७२२२१११okhdfcbank सारखे आयडी वैध असतील. तसेच, जर तुम्ही कस्टम यूपीआय आयडी तयार केला असेल, तर त्यातही बदल करावे लागतील.
हा नियम १ नोव्हेंबरपासून लागू होत असल्याने वेळीच बदल केला नाही तर तुम्हाला यूपीआय पेमेंट्स करता येणार नाहीत. जर सतत यूपीआय पेमेंट फेल झाले तर याचे कारण तुमच्या ट्रांजेक्शन आयडीमध्ये स्पेशल कॅरेक्टर्स असणे हे असू शकते. उदाहरणार्थ, जर तुम्ही rohit@sharma@upi असा आयडी तयार केला असेल, तर आता त्यातून स्पेशल कॅरेक्टर काढून टाकावे लागतील आणि तुमचा आयडी rohitsharmaupi असा काहीतरी असू शकतो.
हेही वाचा :
मलायका अरोराला येतेय अर्जुनची आठवण?, फोटो शेअर करत म्हणाली…
काँग्रेससाठी कशी असेल यंदाची दिल्लीची निवडणूक? आप-भाजपसमोर निभाव लागणार का?
महाकुंभ मेळ्यातील व्हायरल गर्ल मोनालिसाने 10 दिवसांत 10 कोटी कमावले?