आजपासून सुरू होणार संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन
नवी दिल्ली: आजपासून संसदेचे(Parliament) अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. यामध्ये प्रथम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करतील. त्यानंतर, लोकसभा आणि राज्यसभेच्या बैठका होतील आणि अर्थमंत्री आर्थिक सर्वेक्षण सादर करतील.
१ फेब्रुवारी रोजी, म्हणजेच शनिवारी, अर्थमंत्री निर्मला सीतारमण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळाचा पहिला पूर्ण अर्थसंकल्प सादर करतील. संसदेचे(Parliament) हे अर्थसंकल्पीय अधिवेशन ४ एप्रिलपर्यंत चालेल. या अधिवेशनात सरकार वक्फ दुरुस्ती विधेयकासह इतर महत्त्वाची विधेयके मांडण्याची शक्यता आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी गुरुवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. यामध्ये सर्व पक्षांना संसदेचे कामकाज सुरळीत चालविण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले, परंतु विरोधी पक्षांनी आपले मुद्दे स्पष्ट केले.
समाजवादी पक्षाने महाकुंभात झालेल्या अपघातावर चर्चा करण्याची मागणी केली आणि घटनेची पारदर्शक चौकशी करण्याची देखील मागणी केली. राज्यसभेतील काँग्रेसचे उपनेते प्रमोद तिवारी म्हणाले की, विरोधी आघाडी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्व मुद्दे उपस्थित करेल.
आजपासून सुरू होणारे संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन खूप महत्त्वाचे ठरणार आहे. यामध्ये, अर्थमंत्री निर्मला सीतारमण पंतप्रधान मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळाचा पहिला पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहेत, आणि सरकार वक्फ दुरुस्ती विधेयकासह इतर १६ महत्त्वाची विधेयके देखील सादर करू शकते.
हेही वाचा :
वादाच्या गदारोळात ‘छावा’ चित्रपटाचे पहिले गाणे रसिकांच्या भेटीला
वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या सगळ्यांकडून दंड वसूल केला जाणार
रेल्वे ट्रॅकवर बसून गर्लफ्रेंडशी गप्प मारत होता पठ्ठ्या इतक्यात…; VIDEO पाहून उडेल थरकाप