खुशखबर! BSNL ने आणला 12 महिने फ्री कॉलिंगवाला ‘हा’ रिचार्ज प्लॅन
सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ने आपल्या नवीन प्लॅनमधून(recharge) खासगी कंपन्यांना मोठे आव्हान दिले आहे. Jio, Airtel आणि Vi यांनी नुकतेच TRAI च्या निर्देशानुसार फक्त व्हॉइस कॉलिंगसाठीचे प्लॅन सादर केले आहेत, परंतु हे अनेक ग्राहकांसाठी अजूनही महाग आहेत. अशावेळी, BSNL ने 1198 रुपायांमध्ये 12 महिन्यांसाठी व्हॉइस-कॉलिंग प्लॅन सादर केला असून, हा प्लॅन ग्राहकांसाठी मोठा दिलासा ठरू शकतो.
BSNL च्या नव्या प्लॅनमध्ये काय मिळेल?
जर तुम्ही वारंवार रिचार्ज(recharge) करण्याच्या झंझटीला कंटाळला असाल, तर BSNL चा 1198 रुपयांचा प्लॅन तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो.
➡ 12 महिने वैधता – एकदा रिचार्ज केल्यावर पूर्ण वर्षभर कोणत्याही अडचणीशिवाय कॉलिंगचा आनंद घेता येईल.
➡ दरमहा 300 मिनिटे फ्री कॉलिंग – एकूण 3600 मिनिटे मोफत कॉलिंग वर्षभरासाठी उपलब्ध.
➡ दरमहा 3GB डेटा – एकूण 36GB डेटा वर्षभरासाठी मिळेल.
➡ दरमहा 30 SMS मोफत – एकूण 360 SMS वर्षभरासाठी.
Jio, Airtel आणि Vi यांनी देखील व्हॉइस-ओन्ली प्लॅन्स बाजारात आणले आहेत, मात्र हे तुलनेने महाग आहेत. अनेक ग्राहक हे प्रीमियम टेलिकॉम कंपन्यांचे महागडे रिचार्ज परवडत नसल्यामुळे BSNL चा स्वस्त आणि दीर्घकालीन प्लान मोठ्या प्रमाणावर ग्राहकांना आकर्षित करू शकतो.
कोणासाठी हा प्लॅन फायदेशीर ठरू शकतो?
✔ ज्यांना वारंवार रिचार्ज करायचे नाही आणि वर्षभरासाठी फक्त कॉलिंग प्लॅन हवा आहे.
✔ दुय्यम सिमकार्ड (Secondary SIM) सक्रिय ठेवण्यासाठी उत्तम पर्याय.
✔ कमी डेटा आणि मर्यादित कॉलिंग वापरणाऱ्या ग्राहकांसाठी सर्वात किफायतशीर पर्याय.
BSNL चा ₹1198 चा प्लॅन सध्या खूप चर्चेत आहे आणि यामुळे खाजगी कंपन्यांवर मोठा दबाव येण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला दीर्घकालीन किफायतशीर प्लॅन हवा असेल, तर हा पर्याय नक्की विचारात घ्या.
हेही वाचा :
रुग्णांना सर्वात मोठा दिलासा, सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे मंत्रालयातील हेलपाटे वाचणार
प्रजासत्ताक दिनी शाळेतील नाटकात मुलांना खऱ्या फाशीवर चढवले, पाहून शिक्षकही हादरले; Video Viral
सुनीता विल्यम्स यांचा 15 दिवसात दुसऱ्यांदा स्पेसवॉक, वयाच्या 59व्या वर्षी अंतराळात केला भीम पराक्रम