मोठी बातमी! ममता कुलकर्णीला किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदावरून हटवलं

बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीबाबत एक मोठी बातमी(news) समोर येत आहे. त्यांना किन्नड आखाड्याच्या महामंडलेश्वर पदावरून हटवण्यात आलंय. त्यांच्यासोबतच लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनाही आचार्य महामंडलेश्वर पदावरून हटवण्यात आलंय. दोघींचाही पदावरून पायउतार केलाय. किन्नर आखाड्याचे संस्थापक अजय दास यांनी ही कारवाई केली आहे.

अजय दास यांनी आज घोषणा केली की, आता किन्नर आखाड्याची पुनर्रचना केली जाईल. तसेच नवीन आचार्य महामंडलेश्वर यांची लवकरच घोषणा करण्यात येणार आहे. ममता यांना किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर बनवल्यापासून वाद सुरू होता. स्त्रीला या आखाड्याचं महामंडलेश्वर कसं केलं जाऊ शकतं, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते(news).

काही दिवसांपूर्वी ममता कुलकर्णी यांनी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ 2025 मध्ये स्वत:चे पिंड दान केले होते, संन्यास घेतला होता. यानंतर भव्य पट्टाभिषेक कार्यक्रमात त्यांना किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर करण्यात आलं. ममताचं नवीन नाव श्री यमाई ममता नंद गिरी होते. त्या महाकुंभात 7 दिवस राहिल्या, मात्र तेव्हापासून एका महिलेला किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर का केलं, असा वाद सुरू झाला होता.

यावर ममता कुलकर्णी म्हणाल्या की, लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांना त्यांची 23 वर्षांची तपश्चर्या समजली होती. परीक्षा घेण्यात आली, त्यात ममता उत्तीर्ण झाल्या. त्यांना महामंडलेश्वर होण्यासाठी निमंत्रित करण्यात आलं. बॉलीवूडमध्ये परत जाणार नसल्याचंही ममताने स्पष्ट केलं होतं.

यापुढे आता सनातन धर्माचा प्रचार करणार असल्याचं देखील ममता कुलकर्णी म्हणाल्या होत्या. ममता कुलकर्णी यांना महामंडलेश्वर करण्यात आल्याने बराच वाद झाला होता. त्यांची महामंडलेश्वरपदी नियुक्ती केल्याच्या विरोधात संत सातत्याने आंदोलन करत होते.

हेही वाचा :

खुशखबर! BSNL ने आणला 12 महिने फ्री कॉलिंगवाला ‘हा’ रिचार्ज प्लॅन

रुग्णांना सर्वात मोठा दिलासा, सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे मंत्रालयातील हेलपाटे वाचणार

करणवीरने शिल्पा शिरोडकरला केलं किस; अभिनेत्याचं कृत्य पाहून चुमच्या चेहऱ्याचा बेरंग, Video व्हायरल