श्वानासोबत क्रूरता! पाय पकडत गरागरा फिरवले अन् थेट जमिनीवरच आपटले…Video Viral
सोशल मीडियावर नेहमीच अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. यात कधी आपल्याला जीवघेणे स्टंटस पाहायला मिळतात, कधी थरारक अपघात तर कधी विचित्र जुगाड मात्र सध्या इथे एक संतापजनक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यात एक मुलगा श्वानासोबत(dog) गैरवर्तन करताना आणि त्याला त्रास देताना दिसून आला आहे. व्हिडिओतील दृश्ये पाहून नेटकरी आता संताप व्यक्त करत आहेत. यात नक्की काय घडले ते सविस्तर जाणून घेऊया.
अनेक प्राणी हे माणसांपेक्षा कमी बलवान असतात ज्यामुळे बऱ्याचदा माणसं आपल्या आनंदासाठी त्यांचा फायदा उचलू बघतात आणि त्यांना त्रास देऊ लागतात. सध्याच्या व्हायरल व्हिडिओमध्येही असेच काहीसे झाल्याचे दिसत आहेत. यात आपल्या क्षणिक आनंदासाठी काही मुले श्वानाला(dog) त्रास देताना दिसून आली.
मुक्या प्राण्यांना त्रास देऊन आपण काही मोठे साध्य केले असे त्यांना वाटते मात्र त्यांची ही मजा त्या मुक्या प्राण्याच्या जीवावर बेतू शकते याची कल्पना त्यांना येत नाही. अनेकदा अशा घटनांमध्ये प्राण्यांना गंभीर दुखापत झाल्याचे समोर येते. या व्हायरल व्हिडिओतही श्वानासोबत जो प्रकार घडला तो पाहून त्याला दुखापत झाल्याचे समजते.
ही घटना आग्रा येथील थाना बाह क्षेत्रातील असल्याचे समजत आहे. यात काही तरुणानांद्वारे श्वानाला त्रास दिल्याचे समजत आहे. व्हायरल व्हिडिओ जर तुम्ही नीट पाहिला तर तुम्हाला यात दिसेल की, काही तरुण रस्त्यावर मजामस्ती करत आहेत तितक्यात त्यांच्या समोरून एक कुत्रा जाऊ लागतो, आपल्या समोरून कुत्र्याला जाताना पाहताच एक मुलगा श्वानाचा एक पाय पकडतो आणि त्याला हवेत गरागरा फिरवू लागतो.
यावेळी कुत्रा घाबरतो आणि आपले हातपाय हलवत स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतो मात्र याचा काहीच उपयोग होत नाही. तरुण आणखीन जोरजोरात कुत्र्याला गरागरा फिरवतो आणि शेवटी त्याला जमिनीवर आपटतो. यानंतर कुत्रा जमिनीवर निपचित पडून राहतो आणि व्हिडिओचा शेवट होतो.
आगरा-युवक ने बेजुबान कुत्ते से की बदसलूकी, वीडिया सोशल मीडिया पर जमकर वायरल
— भारत समाचार | Bharat Samachar (@bstvlive) January 30, 2025
क्रूरता करने वालों पर कार्रवाई की उठ रही मांग, आगरा के थाना बाह क्षेत्र का मामला#Agra @agrapolice @Uppolice pic.twitter.com/7ZNHbJyTpN
या घटनेचा व्हिडिओ आता एकाने आपल्या कॅमेरात रेकॉर्ड केला असून याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच आता नेटकऱ्यांद्वारे यावर संताप व्यक्त केला जात आहे. याचा व्हिडिओ @bstvlive नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर काहींनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. एका युजरने लिहिले आहे, “पोलिसांनी याला असेच फिरवले पाहिजे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ही क्रूरता आहे”.
हेही वाचा :
अर्थसंकल्पात मध्यमवर्गीय आणि गरीबांसाठी मोठी घोषणा?, पंतप्रधान मोदींचे संकेत
एकनाथ शिंदे नाराज?, महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप होणार?
एसटी कंडक्टरसोबत सुट्ट्या पैशावरुन होणार वाद कायमचा मिटणार; महामंडळाचा मोठा निर्णय