प्रतीक बब्बर दुसऱ्यांदा अडकणार लग्नबंधनात; व्हॅलेंटाईन डे ला प्रियसीसह बांधणार सात जन्माच्या गाठी!
बॉलीवूड चित्रपट ‘छिछोरे’ फेम अभिनेता प्रतीक बब्बर आणि प्रिया बॅनर्जी लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. प्रतीक बब्बरचे हे दुसरे लग्न असणार आहे. प्रतीक आणि प्रिया या दोघेही अनेकदा सोशल मीडियावर फोटो शेअर करून एकमेकांवरील प्रेम व्यक्त करत असताना अनेकदा दिसले आहेत. प्रतीक आणि प्रियाने गेल्या वर्षी साखरपुढा करून त्यांचे नाते अधिकृत केले होते. आता हे दोघेही लवकरच लग्न (marriage) बंधनात अडकणार आहेत. तसेच अभिनेत्याच्या राहत्या घरी या लग्नाचा सोहळा सुरु होणार आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघेही व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने लग्न (marriage) करणार आहेत. असा अंदाज आहे की लग्न समारंभ प्रतीक बब्बरच्या मुंबईतील वांद्रे येथील घरी होणार आहे. तथापि, लग्नाबाबत दोन्ही बाजूंकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. तसेच आता ही बातमी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रसिद्ध अभिनेता राज बब्बर आणि स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतीक बब्बरने नोव्हेंबर २०२३ मध्ये प्रिया बॅनर्जीला तिच्या वाढदिवसाच्या दोन दिवस आधी प्रपोज केले होते, त्यानंतर त्यांनी जानेवारी २०२४ मध्ये साखरपुडा करून त्यांचे नाते सार्वजनिक केले.
एका संभाषणात प्रतीक म्हणाला होता, “मी घटस्फोटातून जात होतो आणि प्रियाचाही साखरपुडा तुटला होता. तेव्हा मी २०२० मध्ये तिच्या डीएममध्ये गेलो. घटस्फोटानंतर मी हे सर्व करण्यास कचरत होतो, पण मला जाणवले की हे माझे जीवन आहे.” असे अभिनेत्याने म्हटले.
यापूर्वी प्रतीकचे लग्न सान्या सागरशी झाले होते आणि चार वर्षांच्या लग्नानंतर २०२३ मध्ये दोघांनी वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. या घटस्फोटाबाबत प्रतीक म्हणाला होता, “घटस्फोट घेणे हा माझ्यासाठी एक हृदयद्रावक निर्णय होता.
त्यावेळी माझी तब्येत चांगली नव्हती. मी खूप दुःखी होतो.” हळूहळू आमच्या नात्यात दुरावा वाढत गेला, ज्यामुळे हा चुकीचा निर्णय घेण्यात आला. जर घटस्फोट झाला नसता तर मी कदाचित या महिलेला (प्रिया बॅनर्जी) भेटलो नसतो.” असे त्यांनी सांगितले होते.
हेही वाचा :
केंद्रीय अर्थसंकल्प सादर, निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा; काय स्वस्त, काय महाग?
‘नेनौ में सपना, सपनों में सजना’ गाण्यावर काकूंनी धरला जबरदस्त ठेका; Video Viral
गंभीर आजाराची 36 औषधे ड्युटी फ्री, सरकारची सर्वात मोठी घोषणा
मेडिकल कॉलेजमध्ये 75 हजार जागा वाढवणार; अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा