WOW इंटरनेटशिवायही WhatsApp वर चॅटिंग शक्य जाणून घ्या ही खास ट्रिक

आजच्या जगात स्मार्टफोन आणि त्यावरचे व्हॉट्सॲप हे प्रत्येकाच्या आयुष्याचा (internet)अविभाज्य भाग बनले आहेत. मित्र, कुटुंबीय आणि सहकाऱ्यांशी जोडलेले राहण्यासाठी व्हॉट्सॲपचा सर्रास वापर होतो. पण व्हॉट्सॲप वापरण्यासाठी तुमच्याकडे डेटा किंवा वाय-फाय असणे गरजेचे असते. डेटा संपला किंवा इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसलेल्या ठिकाणी मात्र व्हॉट्सॲप वापरणे अशक्य होऊन बसते.मात्र, आता चिंता करण्याची गरज नाही! आता तुम्ही इंटरनेटशिवायही व्हॉट्सॲप वापरू शकता आणि आपल्या प्रियजनांशी संपर्कात राहू शकता.

यासाठी आम्ही तुम्हाला एक भन्नाट आणि सोपी ट्रिक सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही डेटा किंवा वाय-फायशिवायही मेसेज पाठवू आणि प्राप्त करू शकाल. विशेष म्हणजे, यासाठी तुम्हाला कुठलेही वेगळे ॲप डाऊनलोड करण्याची गरज नाही, कारण हे फीचर मेटानेच उपलब्ध करून दिले आहे.यासाठी तुम्ही प्रॉक्सी फीचरचा वापर करू शकता. हे फीचर तुम्हाला व्हॉट्सॲपच्या सेटिंग्जमध्येच मिळेल. (internet) याव्यतिरिक्त, तुम्ही तुमच्या लॅपटॉप आणि डेस्कटॉपवर व्हॉट्सॲप वेबचा वापर करूनही इंटरनेटशिवाय चॅटिंग करू शकता.

प्रॉक्सी फीचरचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनमध्ये हे फीचर इनेबल करणे गरजेचे आहे. लक्षात ठेवा, हे फीचर वापरताना तुमचा फोन इंटरनेटशी कनेक्ट नसावा. ॲप प्रॉक्सी नेटवर्कशी कनेक्ट करा. हे फीचर वापरल्याने तुमच्या प्रायव्हसी आणि सिक्युरिटीवर कोणताही परिणाम होत नाही.तुमचे (internet) मेसेजेस एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड राहतील. मात्र, तुम्ही थर्ड-पार्टी प्रॉक्सी वापरत असाल, तर तुमचा IP ॲड्रेस संबंधित प्रोवाइडरसोबत शेअर केला जाऊ शकतो, हे लक्षात ठेवा.

तुम्ही तुमच्या लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर इंटरनेटशिवाय व्हॉट्सॲप वापरायचे असेल तर गुगलवर‘वेब व्हॉट्सॲप’ सर्च करा. त्यानंतर स्कॅनरच्या मदतीने तुमचा फोन कनेक्ट करा. एकदा का तुमचा फोन कनेक्ट झाला की, फोनचे इंटरनेट बंद असले तरीही तुम्ही लॅपटॉप/डेस्कटॉपवर व्हॉट्सॲप वापरू शकता.प्रॉक्सी फीचर इनेबल करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:

तुमच्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सॲप ओपन करा.
उजव्या कोपऱ्यात वर असलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करा.
‘सेटिंग्ज’ Settings हा पर्याय निवडा.
त्यानंतर ‘Storage & Data’ या पर्यायावर क्लिक करा.
आता तुम्हाला ‘Proxy’ हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
‘Proxy Address’ च्या रकान्यात तुम्हाला मिळालेला प्रॉक्सी ॲड्रेस टाका आणि ‘Save’ बटणावर क्लिक करा.
प्रॉक्सी ॲड्रेस सेव्ह झाल्यानंतर तुम्हाला एक हिरवा ठिपका दिसेल. याचा अर्थ तुमचा प्रॉक्सी ॲड्रेस यशस्वीरीत्या कनेक्ट झाला आहे.आता तुम्ही इंटरनेटशिवायही व्हॉट्सॲप वापरू शकता आणि आपल्या प्रियजनांशी जोडलेले राहू शकता. ही सोपी ट्रिक नक्कीच तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

हेही वाचा :

वैज्ञानिकांचा धडकी भरवणारा इशारा; लाखो बळी जाणार, कारण वाचून हादरून जाल

भाजपचा ‘मास्टर प्लॅन’…, आयकरात सूट देऊन मध्यमवर्गीयांची जिंकली मने! आता… 

मद्यधुंद अवस्थेत तरुणाचा धिंगाणा; मोबाईल टॉवरवर चढला अन्… Video Viral