कोल्हापुरातील पर्यटकांसाठी खुशखबर! विशाळगडावर जाण्यासाठी आणखी एका तासाची वेळ वाढवली

कोल्हापूर : कोल्हापुरातील विशाळगड हिंसाचारानंतर तब्बल पाच महिन्यांनंतर 7 जानेवारीला पर्यटकांसाठी(tourists) खुला झाला आहे. प्रशासनाने विशाळगडावर जाण्यासाठी पर्यटकांना परवानगी दिली आहे, पण यासाठी काही नियम व अटी पाळाव्या लागणार आहेत. सध्या ही तात्पुरती परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर आता पर्यटकांसाठी आणखी एक दिलासादायक बाब समोर आली आहे. विशाळगडावरची वेळ आणखी एका तासाने वाढवण्यात आली आहे.

सकाळी 9 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत गडावर जाता येणार आहे. याआधी सकाळी 10 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत गडावर जाण्यासाठी वेळ होती. पर्यटकांना(tourists) पूर्णवेळ गडावर जाण्याची परवानगी देण्याची स्थानिकांची मागणी होती. तर अतिक्रमण काढल्याशिवाय परवानगी देऊ नये अशी हिंदुत्ववादी संघटनांची मागणी होती. मात्र, आता मागणी मान्य करत एका तासाची वेळ वाढवण्यात आली आहे.

विशाळगडावरील दर्गा व इतर देव-देवतांच्या दर्शनासाठी येणाऱ्या पर्यटक व भाविकांना सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली होती.मात्र आता ती वेळ एक तासाने वाढवण्यात आली आहे, सकाळी 9 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत गडावर जाता येणार आहे. सायंकाळी पाचनंतर पर्यटक, भाविकांना गडावर जाता येणार नाही व मुक्कामही करता येणार नाही. कोणत्याही प्रकारची संघटना अथवा जमाव यांना धार्मिक व इतर कार्यक्रमासाठी शाहूवाडी पोलीस आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घ्यावी लागणार आहे.

अप्पर जिल्हादंडाधिकारी यांनी याबाबत मनाई आदेश लागू केला असून या आदेशाची अंमलबजावणी करणे सर्वांना बंधनकारक आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे विशाळगड किल्ला परिसरामध्ये कोणत्याही प्रकारचे मासांहारी पदार्थ घेऊन जाता येणार नाही. तसेच शिजवून खाता येणार नाहीत. पर्यटकांची तपासणी करूनच पर्यटकांना विशाळगडावर सोडण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.

काही महिन्यांपूर्वी अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून विशाळगडावर हिंसाचाराची घटना घडली होती. यावेळी आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी असलेली घरे आणि दुकानांची जाळपोळ केली होती. या घटनेमध्ये गडाच्या परिसरातील स्थानिक नागरिकांचं मोठं नुकसान झालं होतं. याप्रकरणी पोलिसांनी संभाजीराजे छत्रपतींसह 500 जणांवर गुन्हा दाखल केला होता, तर 24 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.

या घटनेला आता जवळपास सहा ते सात महिन्यांचा कालावधी लोटला आहे. मात्र, येथील परिस्थिती अद्यापही बदललेली नाही. पर्यटकचं नसल्यानं सहा महिन्यानंतरही विशाळगडावरील व्यवहार ठप्पच होते. गडावर स्थानिकांव्यतिरिक्त इतर कोणालाही प्रवेश नाकारण्यात आला होता. त्यानंतर आता परिस्थिती पुर्वपदावर येताना दिसत आहे.

जुलै महिन्यामध्ये विशाळगडावरील अतिक्रमणावरून मोठा वाद निर्माण झालेला होता. गडावरील अतिक्रमण हटवण्याची मागणी संभाजीराजे छत्रपती यांच्यासह कार्यकर्त्यांनी केली होती. त्यासाठी त्यांनी ‘चलो विशाळगड’ अशी हाक देत मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमवले होते. यावेळी संभाजीराजे आणि पोलिसांमध्ये चर्चा सुरू असताना गडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर गावात हिंसाचार निर्माण झाला होता. यावेळी अनेक घरांवर दगडफेक झाली होती.

गडावरील दुकाने, घरासमोर लावलेल्या दूचाकी, चारचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. याशिवाय गडाच्या पायथ्याशी असलेल्या लहान विक्रेत्यांच्या सामानाची नासधूसही यावेळी करण्यात आली होती. यामध्ये काही पोलीस जखमी झाले होते. मोर्चाला हिंसक वळण लागल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज करावा लागला होता.

हेही वाचा :

 शाहीद कपूरचा ‘देवा’ चित्रपट ऑनलाईन लीक

WOW इंटरनेटशिवायही WhatsApp वर चॅटिंग शक्य जाणून घ्या ही खास ट्रिक

नात्याला काळीमा! नराधम भावाचा अल्पवयीन बहिणीवर वर्षभर अत्याचार