निवडणुकीच्या तोंडावर ‘त्या’ आठ आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश

नवी दिल्ली : दिल्लीत मतदानाच्या तोंडावर आम आदमी पक्षाला(politics) मोठा झटका लागला आहे. दोन दिवसांपूर्वीच आपच्या आठ आमदारांनी आपला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर आज या सर्व आठही आमदारांना भाजपमध्ये प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे.

भाजपचे(politics) राष्ट्रीय उपाध्यक्ष बैजयंत पांडा आणि दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांच्या उपस्थितीत हे ८ आमदार आणि नगरसेवक अजय राय यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे भाजपसाठी ही आनंदाची बातमी असली तरी आम आदमी पक्षासाठी हा मोठा झटकाच मानला जात आहे.

या आमदारांनी शुक्रवारीच पक्षाचा राजीनामा दिला होता. राजीनामा देणाऱ्या आमदारांमध्ये मादीपूरचे गिरीश सोनी, पालमच्या भावना गौड, कस्तुरबा नगरचे मदनलाल, त्रिलोकपुरीचे रोहित महरौलिया, जनकपुरीचे राजेश ऋषी, महरौलीचे नरेश यादव, आदर्श नगरचे पवन शर्मा आणि बिजवासनचे भूपिंदर सिंह जून यांचा समावेश आहे. या सर्व आमदारांनी आम आदमी पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप करत पक्षाचा राजीनामा दिला होता. शनिवारी त्यांनी अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश केला.

या प्रसंगी भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बैजयंत पांडा यांनी सांगितले की, “आजचा दिवस ऐतिहासिक आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या काही दिवस आधीच एवढ्या मोठ्या संख्येने नेत्यांनी ‘आप’मधून बाहेर पडून नवा मार्ग स्वीकारला आहे.”

हेही वाचा :

 शाहीद कपूरचा ‘देवा’ चित्रपट ऑनलाईन लीक

कोल्हापुरातील पर्यटकांसाठी खुशखबर! विशाळगडावर जाण्यासाठी आणखी एका तासाची वेळ वाढवली

आज मोठे शुभ योग; 3 राशींचं भाग्य उजळणार, पैशाची आवक वाढणार