जीव दिला की जीवानीशी मारले? medical College मध्ये आढळला विद्यार्थिनीचा लटकलेला मृतदेह

आरजी कार मेडिकल कॉलेज(medical college) आणि हॉस्पिटलमध्ये एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षाची २० वर्षीय विद्यार्थिनी आयव्ही प्रसाद तिच्या खोलीत फाशीवर लटकलेल्या अवस्थेत आढळली. ती कोलकात्यातील कामरहाटी ईएसआय हॉस्पिटलच्या क्वार्टरमध्ये तिच्या आईसोबत राहत होती. आरजी कॉलेजमध्ये ती डॉक्टर आहे. या घटनेनंतर आरजी कारमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली. मात्र या प्रकरणी पोलिसांनी ही आत्महत्या असल्याचे म्हटले आहे.

पोलिसांनी सांगितले की, शुक्रवारी (31 जानेवारी 2025) रात्री आयव्ही प्रसाद तिच्या खोलीत एकटीच होती. तेव्हा तिच्या आईने तिला अनेक वेळा फोन केला पण कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने तिच्या आईने दरवाजा तोडला अन् समोर पाहते तर काय… छताला लटकलेला अवस्थेत मृतदेह आढळला. त्यावेळी पीडितेच्या आईने तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी उपचारादरम्यान तिला मृत घोषित केले.

घटनास्थळावरून पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही. पोलिसांनी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे. कामरहाटी पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. आरजी कार मेडिकल कॉलेजमधील(medical college) अधिकाऱ्यांच्या मते, आयव्ही प्रसाद सामान्यतः खूप शांत स्वभावाचे होती. पोलिसांना असा संशय आहे की ती नैराश्याने ग्रस्त होती, ज्यामुळे तिने हे पाऊल उचलले असावे.

पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. कामरहाटी पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी कॉलेज ऑफ मेडिसिन आणि सागर दत्ता रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी सांगितले की विद्यार्थिनी तिच्या आईसोबत एकटी राहत होती, तिचे वडील एका राष्ट्रीय बँकेत अधिकारी आहेत. ते सध्या मुंबईत तैनात आहे.

गेल्या वर्षी ९ ऑगस्ट रोजी कोलकात्याच्या आरजी कर मेडिकल कॉलेजबाबत खळबळ उडाली. येथील सेमिनार हॉलमध्ये रुग्णालयातील एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा मृतदेह आढळला. पोलिसांनी सुरुवातीला ही घटना आत्महत्या असल्याचे वर्णन केले होते ,परंतु प्रकरण वाढत गेले आणि प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर अत्याचार करून नंतर हत्या केल्याचे समोर आले. या घटनेमुळे संपूर्ण देशातच नव्हे तर परदेशातही लोकांमध्ये संताप निर्माण झाला. हे आंदोलन अनेक महिने चालू राहिले आणि डॉक्टरांनी रस्त्यावर निदर्शने केली.

हेही वाचा :

जगात लवकरच काहीतरी भयंकर घडणार… डोनाल्ड ट्रम्प यांनी केले मोठे वक्तव्य

प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने घेतला मोठा निर्णय!

महाराष्ट्र केसरी स्पर्धा वादात, पंचांशी हुज्जत घालणं भोवलं