‘मी तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होऊ नये म्हणून…’; शिवराजचा राक्षेचा आयोजकांवर थेट आरोप

अहिल्यानगर: पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड यांपैरकी यंदाचा महाराष्ट्र केसरी(sports news) कोण होणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. पण महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीच्या दिवशी वादाची ठिणगी पडली. मॅटवरची फायनल शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यात झालेली लढत अत्यंत चुरशीची ठरली. पण पंचाच्या निर्णयामुळे वाद चांगलाच पेटला. अंतिम लढतीत पृथ्वीराज मोहोळने विजय मिळवला. शिवराज राक्षेला पराभव मान्य नव्हता. त्याने पंचांच्या निर्णयावर तीव्र विरोध करत थेट पंचांची कॉलर खेचली आणि त्यांच्यावर लाथही घातली. त्यामुळे वाद चांगलाच चिघळला होता.

माझी पाठ टेकली नव्हती, तसेच आपण पंचांना लाथही मारली नाही, असे सांगत त्याने आपली बाजू मांडली. पण पंचांसोबत भिडल्यामुळे शिवराज राक्षेवर तीन वर्षे कुस्ती खेळण्याची(sports news) बंदी घालण्यात आली आहे. स्पर्धेवेळी पंचांशी गैरवर्तवणूक केल्याचा ठपका ठेवत शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड त्यांचे तीन वर्षांसाठी निंलबन करण्यात आले आहे.

पण त्यानंतर दोन्ही पैलवानांवर करण्यात आलेल्या या कारवाईवरुन राज्यभर क्रीडा वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगू लागल्या आहेत. या सगळ्यात एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शिवराज राक्षेनेही आपली भूमिका मांडली आहे. “आमच्यावरील कारवाई चुकीची आहे. हे सर्वांनी पाहिल आहे. कुस्तू झाली त्यावेळी आम्ही पंचांकडे व्हिडीओ पाहून निर्णय घेण्यची मागणी केली होती. त्याआधी ते निर्णय घेऊ शकत नाही. त्यांनाही तसा अधिकार नाही. आम्ही तिथे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संयोजकांकडेही व्हिडीओ दाखवण्याची आणि त्यानुसार निर्णय घेण्याची मागणी केली.

जर दोन्ही खांदे टेकले असतील तर मी हार मानायला तयार आहे. कुस्तीत हारजीत होत असते, त्याबद्दल शंका नाही. पण पंचाच्या चुकीच्या निर्णयामुळे खेळाडूवर अन्याय होत असेल तर पंचांवरही कारवाई व्हायला हवी, असं शिवराज राक्षेने म्हटलं आहे. तसेच त्यांच्या बाजूचा मीडियाद्वारेही हा निर्णय चुकीचा असल्याचे सांगण्यात आले होते, त्यावेळीही व्हिडीओ दाखवून पंचाचा निर्णय चूक आहे की बरोबर हे स्पष्ट का केलं नाही”, असा प्रश्नही शिवराजने उपस्थित केला.

मुलावर झालेल्या कारवाईनंतर शिवराजच्या आईनेही प्रतिक्रीया दिली आहे. “शिवराज महाराष्ट्र केसरी व्हावा यासाठी मी सकाळपासून देवासमोर बसून प्रार्थना करत होते, पण पंचाच्या चुकीच्या निर्णयामुळे शिवराज हरला. त्याच्यावर पंचाने अन्याय केला. तो फक्त ‘रिप्लाय दाखवा’ असे म्हणत होता, जर ते दाखवलं असतं तर असे काहीच घडले नसते. तो पण काय हलका नाही? डबल महाराष्ट्र केसरी आहे.”

अहिल्यानगरच्या दिवंगत बलभीम अण्णा जगताप क्रीडानगरीत गेल्या चार दिवसांत माती आणि गादी विभागातील वेगवेगळ्या गटांमध्ये कुस्तीचा थरार महाराष्ट्राच्या कुस्तीप्रेमींनी अनुभवला. पण अंतिम दिवशी जे घडलं ते धक्कादायक होतं. मॅट विभागातील अंतिम फेरी नांदेडच्या डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आणि पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळ यांच्यात होणारी लढत रंगली होती. पृथ्वीराज मोहोळने अवघ्या काही मिनिटांत शिवराजला चितपट केलं, पण पंचांचा निर्णय शिवराजला रुचला नाही.

शिवराज राक्षेने या निर्णयाविरोधात पंचांना आव्हान दिलं, आणि रागाच्या भरात पंचांची कॉलर पकडून त्यांच्यावर लाथ घातली. शिवराज राक्षेने याआधी दोन वेळा महाराष्ट्र केसरीची गदा जिंकली होती. त्याने आरोप केला की, तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होऊ नये यासाठी त्याच्याविरोधात जाणूनबुजून निर्णय दिला गेला. यावर त्याचे वस्ताद काका पवार यांनीही नाराजी व्यक्त केली आणि निर्णयाविरोधात आपली भावना व्यक्त केली.

हेही वाचा :

जीव दिला की जीवानीशी मारले? medical College मध्ये आढळला विद्यार्थिनीचा लटकलेला मृतदेह

“स्क्विड गेम 2” मधील अभिनेत्रीचं निधन; चाहत्यांना मोठा धक्का

महाराष्ट्र केसरी स्पर्धा वादात, पंचांशी हुज्जत घालणं भोवलं