डॅशिंग एंट्री पडली महागात; प्रमोशनदरम्यान अर्जुन रामपाल झाले जखमी
राणा दग्गुबाती आणि वेंकटेश यांच्या ‘राणा नायडू २’ या मालिकेच्या रिलीजची घोषणा सोमवारी करण्यात आली. यादरम्यान, चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणारा बॉलिवूड अभिनेता(actor) अर्जुन रामपाल देखील सहभागी झाले होते. नेटफ्लिक्सने मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात २०२५ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या त्यांच्या आगामी चित्रपटांची आणि मालिकांची घोषणा केली. आता या कार्यक्रमातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अर्जुन रामपालच्या बोटातून रक्त वाहत असल्याचे दिसून येते.
कार्यक्रमात अर्जुन रामपालने(actor) काचेची चौकट तोडून स्टेजवर भव्य एन्ट्री केली. यादरम्यान, त्याच्या हाताला दुखापत झाली आणि त्यातून रक्त येऊ लागले. बोटांमधून रक्त येत असतानाही, कार्यक्रमादरम्यान तो अस्वस्थ दिसत असला तरी, अभिनेता त्याच्या चेहऱ्यावर हास्य घेऊन कार्यक्रमाला उपस्थित राहिला. तसेच चाहत्यांना त्यांनी खुश करून टाकले.
काही तांत्रिक अडचणींमुळे कार्यक्रमात बसवलेली काच नीट तुटली नाही, त्यामुळे अर्जुन रामपालला ती स्वतःच्या हातांनी फोडावी लागली, असे म्हटले जात आहे. त्यामुळे त्याच्या हाताला दुखापत झाली. या दुखापतीदरम्यान अभिनेत्याच्या हाताला खंबीर जखम देखील झाली होती. जी पाहून चाहत्यांना खूप वाईट वाटले.
सोमवारी मालिकेच्या दुसऱ्या सीझनच्या घोषणेसोबतच या चित्रपटाचा टीझरही प्रदर्शित करण्यात आला. नेटफ्लिक्सने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “आता विनाश सुरू होईल मामू, कारण ही राणा नायडूची शैली आहे. २०२५ मध्ये येणारा ‘राणा नायडू सीझन २’ फक्त नेटफ्लिक्सवर पहा.” तथापि, चित्रपटाच्या प्रदर्शनाची घोषणा अद्याप झालेली नाही. या मालिकेत सुचित्रा पिल्लई, अभिषेक बॅनर्जी, गौरव चोप्रा, सुरवीन चावला, इशिता अरुण आणि कृती खरबंदा या सगळ्यांचा भूमिका पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा :
भन्नाट ऑफर! HP चा लॅपटॉप मिळतोय फक्त 10 हजारात, खरेदीची सुवर्ण संधी
महाराष्ट्र हादरलं! आई-वडिलांनीच मुलीला साखळदंडात डांबून ठेवलं, समाजात खळबळ
ऐश्वर्या राय बच्चनची लेक आराध्याची दिल्ली उच्च न्यायालयात धाव