‘या’ पदार्थांपासून सावध राहा, वयाआधीच हाडे करतात कमजोर

कॅल्शियम हे शरीरसाठी अत्यावश्यक खनिज असून हाडे आणि दात मजबूत (muscle)ठेवणे, स्नायूंचे कार्य सुरळीत ठेवणे आणि मज्जासंस्थेचे आरोग्य टिकवणे यासाठी ते महत्त्वाचे आहे. मात्र काही विशिष्ट अन्नपदार्थ शरीरातील कॅल्शियम शोषणात अडथळा निर्माण करतात किंवा कॅल्शियमची कमतरता वाढवू शकतात. अशा पदार्थांचे सेवन हाडांच्या आरोग्यावर परिणाम करु शकते. हाडांसाठी हानिकाकर अशा कॅल्शियम कमी करणाऱ्या पाच प्रमुख पदार्थांबद्द अधिक जाणून घेऊया.

मीठ

जास्त मीठ खाणे शरीरातील कॅल्शियमची कमतरता निर्माण करू शकते. सोडियमयुक्त पदार्थ, जसे की चिप्स, प्रक्रिया केलेले अन्न आणि फास्ट फूड, जास्त प्रमाणात खाल्ल्यास, मूत्रपिंड कॅल्शियम बाहेर टाकते. यामुळे हाडांची घनता कमी होते आणि ऑस्टियोपोरोसिसचा धोका वाढतो. हाडांचे आरोग्य टिकवण्यासाठी मीठाचे सेवन मर्यादित ठेवणे आवश्यक आहे. संतुलित आहार आणि सोडियमयुक्त पदार्थ कमी खाल्ल्यास हाडे (muscle)मजबूत राहण्यास मदत होते.

कॅफिनयुक्त पेये

कॅफिनयुक्त पेये जसे की कॉफी, चहा आणि एनर्जी ड्रिंक्स यांचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने शरीरातील कॅल्शियम शोषणावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. कॅफिनमुळे कॅल्शियमचे नुकसान वाढून ते मूत्राद्वारे शरीरातून बाहेर टाकले जाते, ज्यामुळे हाडे कमजोर होण्याचा धोका वाढतो. कॅफिनयुक्त पदार्थांचा आनंद घेताना प्रमाणावर लक्ष द्या आणि आहारात कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश करा. संतुलित आहार आणि नियंत्रित कॅफिन सेवन हाडांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे.

सॉफ्ट ड्रिंक्स

सॉफ्ट ड्रिंक्स आणि कार्बोनेटेड पेयांमध्ये असलेले फॉस्फोरिक अ‍ॅसिड शरीरातील कॅल्शियमची पातळी घटवते. हे आम्ल कॅल्शियमसोबत जोडून असे संयुग तयार करते जे शरीराला शोषता येत नाही. शीतपेयांचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने हाडांची घनता कमी होऊन हाडे कमजोर होतात. यामुळे ऑस्टियोपोरोसिसचा धोका वाढतो. हाडांचे आरोग्य टिकवण्यासाठी सॉफ्ट ड्रिंक्स मर्यादित प्रमाणात प्या आणि कॅल्शियमयुक्त(muscle) आहाराचा समावेश करा. संतुलित आहार आणि सॉफ्ट ड्रिंक्सचे नियंत्रित सेवन हाडांसाठी फायदेशीर ठरते.

उच्च प्रथिनेयुक्त आहार

प्रथिने शरीरासाठी आवश्यक असली तरी त्याचे अतिप्रमाणात सेवन कॅल्शियम शोषणावर नकारात्मक परिणाम करू शकते. जास्त प्रथिनेयुक्त पदार्थ, जसे की लाल मांस, अंडी आणि प्रथिने पूरक आहार, शरीरातील आम्ल पातळी वाढवतात. या आम्ल पातळीचे संतुलन राखण्यासाठी शरीर कॅल्शियमचा वापर करते, ज्यामुळे हाडांमधील कॅल्शियमची पातळी कमी होऊ शकते. हाडांच्या आरोग्यासाठी प्रथिने प्रमाणित प्रमाणात घेणे आणि कॅल्शियमयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे, ज्यामुळे हाडे मजबूत राहू शकतात.

हेही वाचा :

भन्नाट ऑफर! HP चा लॅपटॉप मिळतोय फक्त 10 हजारात, खरेदीची सुवर्ण संधी

महाराष्ट्र हादरलं! आई-वडिलांनीच मुलीला साखळदंडात डांबून ठेवलं, समाजात खळबळ

ऐश्वर्या राय बच्चनची लेक आराध्याची दिल्ली उच्च न्यायालयात धाव