लहान मुलांच्या नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा ब्रोकोली चीज पराठा
![](https://alphabetnews.in/wp-content/uploads/2025/02/image-104.png)
लहान मुलांना ब्रोकोली(broccoli) खायला आवडत नाही. ब्रोकोली पाहिल्यानंतर मुलं बऱ्याचदा नाक मुरडतात. मात्र ब्रोकोली खाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यापासून ते वाढलेला रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारामध्ये ब्रोकोलीचे सेवन करावे.
![](https://alphabetnews.in/wp-content/uploads/2025/02/image-101-1024x1024.png)
ब्रोकोलीमध्ये(broccoli) अनेक गुणकारी घटक आढळून येतात. कमी फॅट्स युक्त ब्रोकोलीपासून तुम्ही वेगवेगळे पदार्थ बनवू शकता. सूप, भाजी इत्यादी पदार्थ बनवले जातात. मात्र आज आम्ही तुम्हाला ब्रोकोली चीज पराठा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.
हा पराठा तुम्ही घाईगडबडीच्या वेळी सोप्या पद्धतीमध्ये बनवू शकता.पराठा बनवताना नाचणीच्या पिठाचा वापर करावा. थंडीच्या दिवसांमध्ये नाचणीचे सेवन केल्यामुळे शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया ब्रोकोली चीज पराठा बनवण्याची सोपी रेसिपी.
साहित्य:
- नाचणीचे पीठ
- ब्रोकोली
- चीज
- मीठ
- तेल
- कांदा
- कोमट पाणी
कृती:
- ब्रोकोली चीज पराठा बनवण्यासाठी सर्वप्रथम, नाचणीचे पीठ गरम पाणी टाकून व्यवस्थित मळून घ्या. पिठामध्ये उकळलेले गरम पाणी टाकावे.
- त्यानंतर कढई गरम करून त्यात तेल टाका. तेल गरम झाल्यानंतर त्यात जिरं टाकून वरून बारीक चिरलेला कांदा टाकून लाल होईपर्यंत मिक्स करून घ्या.
- कांदा लाल झाल्यानंतर त्यात बारीक चिरून घेतलेली ब्रोकोली, चवीनुसार मीठ, चिली फ्लेक्स आणि पांढरे तीळ टाकून मिक्स करा. नंतर गॅस बंद करून तयार केलेली ब्रोकोलीची भाजी मॅश करून घ्या.
- नाचणीच्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून त्यात सारण आणि किसून घेतलेलं चीज टाकून पराठा हलक्या हाताने लाटून घ्या.
- तव्यावर पराठा दोन्ही बाजूने भाजून घ्या आणि वरून तूप लावून सर्व्ह करा.
- तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला ब्रोकोली चीज पराठा.
हेही वाचा :
यंदा उन्हाचा कडाका वाढण्याची शक्यता…
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलाच्या हालचालींना पुन्हा वेग
विश्वासघात! पत्नीने पतीची किडनी विकली अन् प्रियकरासोबत फरार