आमदार राहुल आवाडे महापालिकेत कधी सक्रिय होणार?

इचलकरंजी महापालिकेच्या निवडणुकीचे निकाल लागून तब्बल 72 दिवस झाले आहेत.(corporation) मात्र, माजी आमदार राहुल आवाडे यांनी अद्याप महापालिकेत प्रवेश केलेला नाही. महापालिकेच्या विकासकामांचा आढावा घेणे किंवा प्रशासकीय कामकाजात सक्रिय सहभाग नोंदवणे, या बाबतीतही त्यांनी कोणतीच ठोस भूमिका घेतलेली नाही.

महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर नागरिकांना अपेक्षा होती की, राहुल आवाडे महापालिकेत प्रत्यक्ष येऊन विकासकामांना गती देतील. महापालिकेच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक आणि विकास प्रकल्पांना चालना देण्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा, अशी नागरिकांची अपेक्षा होती. मात्र, त्यांच्या (corporation)अनुपस्थितीमुळे अनेक विकासकामे रखडली आहेत, अशी नागरिकांची भावना आहे.
महापालिकेच्या प्रशासकीय कामांमध्ये लोकप्रतिनिधींची उपस्थिती महत्त्वाची मानली जाते. यामुळे केवळ विकासकामे गतीने होतात असे नाही, तर सामान्य नागरिकांना त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी विश्वासाचा आधारही मिळतो. मात्र, राहुल आवाडे यांच्या महापालिकेतील अनुपस्थितीमुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे.
नागरिकांमध्ये आता चर्चा सुरू झाली आहे की, राहुल आवाडे महापालिकेत कधी सक्रिय होणार? त्यांचा या कामांमध्ये सहभाग किती महत्त्वाचा ठरणार आहे आणि ते विकासकामांना (corporation)किती प्राधान्य देतील, याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत.महापालिकेच्या विकासासाठी त्यांनी लवकरच सक्रिय भूमिका बजावावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे
हेही वाचा :
सलमान खानच्या लग्नाची चर्चा जोरात! ‘ही’ अभिनेत्री बनणार भाग्यवती?
VIDEO VIRAL महिला न्यूज अँकरचा प्रायव्हेट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
सॅमसंग गॅलेक्सी S25 सिरीज भारतात लाँच; जाणून घ्या किंमत आणि ऑफर्स!