चिमुकल्याची चूक अन् भीषण अपघात गाडीखाली चिरडला Video Viral

सध्या सोशल मीडियावर एका थरारक अपघातच व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल (cctv)होताना दिसून येत आहे. व्हिडिओतील दृश्ये इतकी भयाण आहेत की ती पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. यात चिमुकल्याला आपली चुक जास्तच महागात पडल्याचे दिसून आले. यावेळी त्याचे वडीलही तेथे उपस्थित असतात मात्र चिमुकला त्यांची नजर चुकवून पळत पळत पुढे जातो आणि पुढच्याच क्षणी एका चारचाकीखाली चिरडला जातो. हे संपूर्ण दृश्ये तेथील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले ज्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर शेअर व्हायरल होत आहे.

व्हिडिओच्या सुरूवातील आपण पार्किंगमधील काही दृश्ये पाहू शकतो. इथे काही चारचाकी पार्क केल्याचे दिसून येते. तसेच काही लोकही यावेळी इथे वावरत असतात. अशातच इथे तुम्हाला एक व्यक्ती फोनमध्ये व्यस्त दिसेल. या व्यक्तीच्या मागूनच चिमुकला धावत पुढे जातो आणि आपल्या जीवनातील मोठी चूक करून बसतो. वास्तविक, पुढे जाऊन जे घडते ते फार भयाण असते, चिमुकला पुढे जाताच त्याच्या नकळत समोरून वेग वेगवान (cctv)कार येते आणि थेट त्याला चिरडत पुढे निघून जाते.हे संपूर्ण दृश्ये अचानक एक थरारक वळण घेते. चिमुकला चिरडल्याचे पाहताच आजूबाजूची लोक जमा होतात आणि कारचालकाला बाहेर काढून मारायला सुरुवात करतात. चिमुकल्याला त्याचे वडील उचलतात पण यांनतर त्याचे काय झाले हे व्हिडिओत सांगितलेले नाही.
CCTV video of a 5yr unattended child coming under a MPV car (Innova)
— Gary Pike @pikewala.bsky.social (@PikeWala) February 7, 2025
The innocent car driver had no time to see or prevent this accident.
In my opinion the Child's father should have held his hand in an unsafe place like parking lot.
Child did not survive. @ #Nashik Maharashtra pic.twitter.com/cXq1IiTLkM
चिमुकल्याच्या अपघाताचा हा व्हिडिओ नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेविषयीची माहिती देण्यात आली आहे. तसेच अनेकांनी(cctv) यावर कमेंट्स करत या अपघातावर आपले मतही मांडले आहेत. एका युजरने लिहिले आहे, “तो वेगवान नसलेल्या ड्रायव्हरचा दोष आहे असे समजू नका, ही चूक पालकांची आहे ज्यांनी लक्ष देणे आवश्यक होते” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मोबाईल च्या नादात पोरांवर लक्ष ठेवत नाही आणी गाडीवाल्याना दोष देतात ही लोक”.
हेही वाचा :
सलमान खानच्या लग्नाची चर्चा जोरात! ‘ही’ अभिनेत्री बनणार भाग्यवती?
VIDEO VIRAL महिला न्यूज अँकरचा प्रायव्हेट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
सॅमसंग गॅलेक्सी S25 सिरीज भारतात लाँच; जाणून घ्या किंमत आणि ऑफर्स!