एक्स पतीसोबतच्या नात्याबद्दल सई ताम्हणकरचा खुलासा, म्हणाली त्या रात्री आम्ही…

मराठी सिनेसृष्टीतील(film industry) ग्लॅमरस अभिनेत्री सई ताम्हणकर कायमच तिच्या प्रोफेशनल आयुष्यासाठी चर्चेत असते. मात्र, सध्या ती तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सईने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या वैवाहिक जीवनावर मोठा खुलासा केला. लग्न, घटस्फोट आणि त्यानंतरचे नाते याबद्दल तिने मनमोकळ्या गप्पा मारल्या.

सई ताम्हणकरने(film industry)) 2013 मध्ये अमेय गोसावी सोबत लग्न केलं. मात्र, अवघ्या दोन वर्षांत त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. तरीसद्धा, दोघे आजही चांगले मित्र आहेत, असं खुद्द सईने सांगितलं.
तिने सांगितलं की, “घटस्फोटानंतर काही काळ मला अजूनही ‘सई ताम्हणकर गोसावी’ असंच नाव ऐकायला यायचं. अखेर आम्ही भेटायचं ठरवलं. दोन ड्रिंक्स घेतल्या आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला. हसू, रडू आणि जीवनाबद्दल गप्पा मारल्या. नंतर काही मित्रही आम्हाला जॉइन झाले आणि त्या रात्री आम्ही चांगला वेळ घालवला.
घटस्फोटानंतरही सईने आपल्या लग्नाच्या आणि प्रपोजलच्या दिवसाचा टॅटू कायम ठेवला आहे. याबद्दल बोलताना ती म्हणाली, “एक वेळ येते जेव्हा काही नाती संपतात, पण त्या व्यक्तीने दिलेले काही क्षण कायम स्मरणात राहतात. त्यामुळे ते विसरण्याची मला गरज वाटत नाही.”
सई ताम्हणकरच्या या वक्तव्यावर चाहत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी तिच्या सकारात्मक दृष्टिकोनाचं कौतुक केलं आहे, तर काहींनी तिच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केलं आहे.
हेही वाचा :
भाजप नेत्यांशी पुन्हा जवळीक, समरजीत घाटगेंच्या मनात काय?
जंगलात दिसून आला पांढराशुभ्र हरीण अलौकिक Video Viral
आता जाण्याची वेळ आली…, अमिताभ बच्चन यांच्या ‘त्या’ ट्विटनंतर चाहते चिंतेत