प्राजक्ता माळी पोहोचली महाकुंभमेळ्यात, त्रिवेणी संगमात केलं शाही स्नान, पाहा VIDEO

१२ वर्षांतून एकदा उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे कुंभमेळा होतो. तर १४४ वर्षांतून एकदा महाकुंभ होतो. १३ जानेवारीपासून सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात(Mahakumbh Mela) गंगा, यमुना आणि पौराणिक सरस्वती नद्यांच्या त्रिवेणी संगमावर जगभरातील लाखो भाविक स्नान करीत आहेत.

महाकुंभमध्ये(Mahakumbh Mela) यात्रेकरुंची संख्या दिवसागणिक वाढत असून दररोज लाखो भाविक संगममध्ये पवित्र स्नान करण्यासाठी आणि अध्यात्मिक पुण्य प्राप्तीसाठी येत आहेत. कुंभमेळा हा जगातील सर्वांत मोठा धार्मिक सोहळा मानला जातो. कुंभमेळ्यात संगमावर स्नान केल्यास मृत्यूनंतर मोक्ष मिळतो अशी भाविकांची श्रद्धा आहे. सर्वसामान्यांपासून विविध सेलिब्रिटीसुद्धा महाकुंभमध्ये पवित्र स्नान करत आहेत. अशातच मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीसुद्धा कुंभमेळ्याला पोहोचली आहे.
व्हिडिओ शेअर करत अभिनेत्रीने तिला आलेला विलक्षण अनुभव पोस्टच्या माध्यमातून शेअर केला आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेत्री म्हणते, “तीर्थराज- प्रयागराज #महाकुंभ #२०२५ लहानपणापासूनच कुंभ मेळ्याविषयी मनात कुतूहल होतं. १४४ वर्षांनी होणारा हा मेळा याची देही याची डोळा पहावा, अनुभवावा असं मनात आलं आणि पोचले.
(काल सुखरूप महाराष्ट्रातही पोचले.) आयुष्यात एकदाच येणारा अनुभव…” असं कॅप्शन देत अभिनेत्रीने हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. प्राजक्ताने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये चाहत्यांना प्रयागराजची झलक दाखवली असून तिथली व्यवस्था, विविध आखाडे, साधूसंतांची भेट, देवदेवतांची पूजा आणि त्यानंतर संगममध्ये पवित्र स्नानही दाखवले आहे.
अभिनेत्रीने शेअर केलेल्या पोस्टवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. तिने शेअर केलेल्या व्हिडिओचं चाहत्यांनी कौतुक केले आहे. शुटिंगच्या बिझी शेड्युल्डमधून अभिनेत्रीने वेळ काढत महाकुंभमेळ्याला हजेरी लावलेली आहे. प्राजक्ता माळीच्या कामाबद्दल बोलायचं तर, ऑक्टोबर २०२४ मध्ये रिलीज झालेल्या ‘फुलवंती’ चित्रपटातून तिने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे. त्यासोबतच अभिनेत्रीने या चित्रपटामध्ये प्रमुख अभिनेत्री म्हणूनही काम केलं आहे.
या चित्रपटामुळे तिच्या लोकप्रियतेतही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. तिच्या ह्या चित्रपटातील तिने साकारलेल्या भूमिकेचं आणि नृत्याचंही खूप कौतुक झालं. प्राजक्ता सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोचं सूत्रसंचालन करत आहे. शिवाय ती प्रसाद खांडेकर दिग्दर्शित आगामी ‘चिकी चिकी बुबुम बुम’ या मराठी चित्रपटातही झळकणार आहे. २८ फेब्रुवारीला हा चित्रपट रिलीज होणार आहे.
हेही वाचा :
महाराष्ट्र हादरला..! महिलेची हत्या करुन मृतदेहावर बलात्कार
अंगा पेक्षा बाेंगा मोठा! हाराच्या ओझ्याने नवरदेवच दिसेना; VIDEO
सैफ अली खान आणि करीना कपूरचा घटस्फोट? ‘बेबो’ने शेअर केलेल्या पोस्टने एकच खळबळ