आपच्या पराभवानंतर महाविकास आघाडी अलर्टवर; महापालिका निवडणुकांसाठी होणार फेरविचार

मुंबई: दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या(political issue) विजयानंतर विरोधी पक्षांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या निकालांचा परिणाम यंदा होणाऱ्या बिहार विधानसभा तसेच महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर होण्याची शक्यता आहे. दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर ‘इंडिया’ आघाडीत नव्याने विचारमंथन सुरू होण्याची शक्यता असून, अनेकांनी एकत्र न लढल्याने काँग्रेस आणि आम आदमी पक्षाचे नुकसान झाल्याचे स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर महाविकास आघाडीतील(political issue) पक्ष स्वतंत्रपणे नागरी निवडणुका लढवण्याच्या तयारीत होते. मात्र, दिल्लीतील निकाल पाहता एमव्हीएला नव्याने रणनीती आखावी लागणार आहे. शिवसेना (यूबीटी) खासदार संजय राऊत हे स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर ठाम होते. त्यांनी वारंवार विधान करून सांगितले होते की, उद्धव ठाकरे मुंबई महापालिका निवडणुकीत स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेऊ शकतात. मात्र, दिल्ली निकालानंतर ही भूमिका पुन्हा चर्चेचा विषय बनली आहे.

सर्व राजकीय पक्ष आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तयारीला लागले आहेत. भाजपमध्ये कोअर कमिटी, बूथ प्रमुख आणि कार्यकर्त्यांसोबत नियमित बैठका घेतल्या जात आहेत. शिवसेना (यूबीटी) कडूनही मुंबई महापालिका निवडणुकीसाठी विशेष तयारी सुरू असून उद्धव ठाकरे यांनी नुकतीच प्रमुख नेत्यांसोबत ऑनलाइन बैठक घेतली. महाराष्ट्राचे मंत्री आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी सांगितले की, दिल्लीच्या जनतेने संधीसाधू राजकारणाला धडा शिकवला आहे. फसव्या घोषणांच्या आडून काम करणाऱ्या नेतृत्वाला लोकांनी स्पष्ट संदेश दिला आहे.

मंत्री शेलार म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी(political issue) यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन दिल्लीने राष्ट्रवादी विचारधारेला मोठा पाठिंबा दिला आहे. राहुल गांधींच्या काँग्रेसला लोकांनी साफ नाकारले. महाराष्ट्र आणि दिल्ली जिंकल्यानंतर, आता आर्थिक राजधानी मुंबईतही हा बदल अटळ आहे. महापालिकेत २५ वर्षांपासून भ्रष्टाचार करणाऱ्यांना घरी पाठवले जाईल!”

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका, 26 जिल्हा परिषदा, 257 नगरपालिका आणि 289 नगरपंचायतींच्या निवडणुका गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित आहेत. वेगवेगळ्या कारणांमुळे या निवडणुका वेळेवर झाल्या नाहीत, परिणामी स्थानिक प्रशासन अधिकाऱ्यांच्या हातात गेले आहे. दरम्यान, 27 एप्रिल 2020 रोजी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा कार्यकाळ संपला, तर सर्वात शेवटी 27 डिसेंबर 2023 रोजी अहिल्यानगर महानगरपालिकेचा कार्यकाळ संपला. मात्र, या निवडणुका अद्याप झालेल्या नाहीत.

स्थानिक पातळीवर लोकप्रतिनिधी नसल्याने वॉर्ड पातळीवरील अनेक विकासकामे रखडली आहेत. सध्या संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा अधिकाऱ्यांच्या हाती आहे, त्यामुळे लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी लोकशाहीतील निवडून आलेले प्रतिनिधीच नाहीत. निवडणुका लवकरात लवकर व्हाव्यात म्हणून काही याचिकाकर्त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. लोकशाहीतील महत्त्वाचा भाग असलेल्या या निवडणुकांवर विलंब झाल्याने राजकीय प्रक्रियेतही अडथळे निर्माण झाले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून नवीन नेतृत्व उदयास येते, मात्र सध्याच्या परिस्थितीत ही संधी मिळत नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील स्थानिक निवडणुकांवर लवकर निर्णय होण्याची गरज आहे.

हेही वाचा :

महाराष्ट्र हादरला..! महिलेची हत्या करुन मृतदेहावर बलात्कार

अंगा पेक्षा बाेंगा मोठा! हाराच्या ओझ्याने नवरदेवच दिसेना; VIDEO

प्राजक्ता माळी पोहोचली महाकुंभमेळ्यात, त्रिवेणी संगमात केलं शाही स्नान, पाहा VIDEO