Video : लग्नाचा आनंद दु:खात बदलला; डान्स करताना तरुणीचा हृदयविकाराने मृत्यू!

एक हृदयद्रावक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक तरुणी आनंदाने नाचत असताना अचानक तिचा तोल जातो आणि ती खाली पडते. काही क्षणातच तिचा मृत्यू होतो. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. तंदुरुस्त दिसणाऱ्या या तरुणीचा(woman) हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

ही घटना 8 फेब्रुवारी 2025 रोजी मध्य प्रदेशातील विदिशा शहरात घडली. डान्स करताना मृत्यू झालेल्या तरुणीचे(woman) नाव परिणीता जैन असून ती इंदूरची रहिवासी होती. आपल्या बहिणीच्या लग्नासाठी ती विदिशा येथे आली होती.

बहिणीच्या संगीत सोहळ्यातील हा व्हिडिओ आहे. परिणीता जैन आनंदाने नाचत होती. नाचता-नाचता तिला हृदयविकाराचा झटका आला आणि ती खाली कोसळली. उपस्थितांनी तिला उठवण्याचा प्रयत्न केला, पण तिने कोणताही प्रतिसाद दिला नाही. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

डान्सचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमुळे हृदयविकाराचा झटका आणि आरोग्याबद्दल चिंता व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

हेही वाचा :

महिलांसाठी खास बचत योजना : 1 हजाराच्या गुंतवणुकीतून मिळेल लाखोंचा फायदा

अंबानींच्या धाकट्या सुनेचा मित्राच्या लग्नातील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

‘तुला तुझ्या पालकांना S*x करताना…’, India’s Got Latent मधील प्रश्नामुळे रणवीर अलाहबादीया वादात