भर कॉन्सर्टमध्येच सोनू निगम चाहत्यांवर भडकला; Video Viral

अनेक सिंगर सध्या वेगवेगळ्या शहरांमध्ये जाऊन आपला गाण्याचा कार्यक्रम(concert) करताना पाहायला मिळत आहे. या यादीमध्ये दिलजीत दोसांझ, ए. आर. रहमान, अर्जित सिंग, श्रेया घोषाल सह सोनू निगमचाही समावेश आहे.

नुकताच सोनू निगमने एक कॉन्सर्ट केला. त्या कॉन्सर्टमध्ये गायकाने माईकवरूनच कॉन्सर्टला(concert) आलेल्या एका चाहत्यावर संतापलेला आहे. त्या घटनेचा सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्या व्हायरल व्हिडिओमध्ये गायक आलेल्या प्रेक्षकावर चांगलाच संतापलेला दिसत आहे.
‘वी ट्रॅव्हल फॉर ड्रीम’ नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर कॉन्सर्टमधला व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे. सोनू निगमचा हा शेअर केलेला व्हिडिओ कोलकात्यातील एका म्युझिक कॉन्सर्टमधील आहे. सध्या हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये, सोनू कॉन्सर्टमध्ये आपल्या पुढच्या गाण्याची तयारी करताना दिसत आहे. त्या दरम्यान, त्याच्या हातात माईक होता.
काही उपस्थित असलेले चाहते खूपच त्याला त्रास देत होते. त्यावेळी त्याने भर कॉन्सर्टमध्ये माइकवरुन आपला प्रेक्षकांप्रती असलेला राग व्यक्त केला. “खाली बस नाहीतर बाहेर निघून जा”, अशा शब्दात सोनू निगम कॉन्सर्टमध्ये आलेल्या प्रेक्षकांना सुनावताना दिसला.
स्टेजवरुनच सोनू माइक हातात घेऊन उपस्थित प्रेक्षकांना वैतागून म्हणतो की, “तुला जर उभंच राहायचं असेल तर निवडणुकीत जाऊन उभं राहा. कृपया लवकरात लवकर बसून घे. किती वेळ जातोय माझा तुला माहित आहे? लवकर बस नाहीतर बाहेर जा. ही जागा रिकामी करा.” अशा शब्दात चालू कॉन्सर्टमध्ये सोनू निगम प्रेक्षकांवर भडकला आहे.
हा व्हिडिओ सध्या इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होत असून चाहते सोनूचे कौतुक करीत आहेत. शिवाय, कॉन्सर्ट दरम्यान गायकांना त्रास देणाऱ्यांचेही अनेक युजर्सने कानउघडणी केली आहे. दरम्यान, सोनू निगमचा हा कोलकात्यातील व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून चाहते व्हिडिओ शेअर करीत आहेत.
गेल्या आठवड्यातच सोनू निगमने राष्ट्रपती भवन दिवसाचं औचित्य साधून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्याने राष्ट्रपतींसमोर लाइव्ह परफॉर्मन्सही केला. सोनू निगम सध्या विविध बॉलिवूड आणि मराठी गाण्यांसाठी त्याच्या स्वरांचा साज चढवत आहे. जानेवारी २०२५ मध्ये रिलीज झालेल्या ‘संगीत मानापमान’ चित्रपटातील सोनू निगमने गायलेलं ‘चंद्रिका’ गाणं चांगलंच लोकप्रिय झालं. सोनू निगमने गायलेली अनेक मराठी आणि हिंदी गाणी चाहत्यांच्या प्लेलिस्टमध्ये आहेत.
हेही वाचा :
Video : लग्नाचा आनंद दु:खात बदलला; डान्स करताना तरुणीचा हृदयविकाराने मृत्यू!
‘तुला तुझ्या पालकांना S*x करताना…’, India’s Got Latent मधील प्रश्नामुळे रणवीर अलाहबादीया वादात
महिलांसाठी खास बचत योजना : 1 हजाराच्या गुंतवणुकीतून मिळेल लाखोंचा फायदा