महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने घेतला मोठा निर्णय!

महिला दिनाच्या(Women Day) पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेश सरकारने महिला कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘वर्क फ्रॉम होम’ सुविधा जाहीर केली आहे. या निर्णयामुळे महिलांच्या कामाच्या उत्पादकतेत वाढ होईल आणि त्यांना अधिक लवचिकता मिळेल, असे नायडू यांनी सांगितले.

मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी ‘एक्स’ वर पोस्ट करत या निर्णयाची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, कोविड-19 महामारीनंतर जगभरातील कामाच्या पद्धतीत मोठे बदल झाले आहेत. तंत्रज्ञानाच्या मदतीने घरून काम करणे अधिक सोयीस्कर आणि उत्पादक झाले आहे.

नायडू यांनी असेही स्पष्ट केले की, रिमोट वर्क, कोवर्किंग स्पेस आणि नेबरहुड वर्कस्पेससारख्या सुविधांमुळे महिलांना(Women Day) घरबसल्या काम करण्याची चांगली संधी मिळेल. यामुळे महिलांचे करिअर आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या यामध्ये योग्य समतोल राखता येईल.

चंद्रबाबू नायडू यांनी सांगितले की, आंध्र प्रदेश आयटी आणि जीसीसी धोरण 4.0 हे महिलांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यास मदत करणार आहे. राज्यातील प्रत्येक शहर आणि विभागात आयटी ऑफिसेस स्थापन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाईल.

सरकारने आयटी आणि जीसीसी कंपन्यांना प्रोत्साहन देण्याची योजना आखली आहे, ज्यामुळे महिलांना त्यांच्या करिअरमध्ये मोठी संधी मिळेल. हा निर्णय काम आणि जीवनातील संतुलन सुधारण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल असल्याचेही त्यांनी नमूद केले.

महिला आणि मुलींना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित क्षेत्रात संधी मिळाव्यात, यासाठी सरकार पूर्णपणे वचनबद्ध आहे. महिलांना करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी आवश्यक सर्व सुविधा आणि सहकार्य दिले जाईल, असेही चंद्रबाबू नायडू यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा :

एकनाथ शिंदेचं ‘मिशन टायगर ‘ कामयाब; ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र,’ राजन साळवी हाती धनुष्यबाण घेणार

मोबाईल रिचार्ज आता स्वस्त होणार, ट्रायच्या नवीन नियमामुळे ग्राहकांना दिलासा

गजब बेइज्जती है यार…! हस्तांदोलनासाठी मोदींकडून हात पुढे, पण फ्रान्सच्या अध्यक्षांचं दुर्लक्ष