काँग्रेसला आता नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार ! ना पृथ्वीराज चव्हाण, ना वडेट्टीवार ‘या’ नावावर शिक्कामोर्तब?

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला(Congress) महाराष्ट्रात अपेक्षित असे यश मिळाले नाही. या पराभवाची जबाबादरी स्वीकारत काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा नाना पटोले यांनी दिला होता. आता हा राजीनामा मंजूर करण्यात आला असून, या पदावर माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची निवड निश्चित मानली जात आहे. त्यांच्या नावावर शिक्कामोर्तबही झाल्याची माहिती दिली जात आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-शिवसेना (Congress)-राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं होतं. पण, विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षित असे यश मिळाले नाही. इतकेच नाहीतर अनेक दिग्गज नेतेमंडळींचा या निवडणुकीत पराभव झाला. या पराभवाची जबाबदारी स्वीकारत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा देण्याची तयारीही दर्शवली होती. मात्र, त्यावेळी हा राजीनामा झाला नाही.
पण, आता त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. याच पदावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, ऐनवेळी सपकाळ यांचे नावे पुढे आले असून, निवडही केली गेल्याचे सांगण्यात आले आहे.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या निकालात विरोधी महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाल्यानंतर नेत्यांमध्ये खडाजंगी सुरू झाल्याचे पाहिला मिळाले होते. प्रमुख विरोधी पक्षाने लढलेल्या 103 जागांपैकी केवळ 16 जागा जिंकल्याने प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत होती. अखेर हा राजीनामा झाला आहे.
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. काँग्रेसला केवळ 16 च जागा जिंकता आल्या, त्यानंतर आता काँग्रेसमध्ये अंतर्गत घडामोडींना वेग आला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा राजीनामा घेतला जाऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. तत्पूर्वी त्यांनीच राजीनामा दिला होता. त्यातच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष होऊ शकतात, असा अंदाज लावला जात होता. मात्र, आता ऐनवेळी सपकाळ यांचे नाव पुढे आले आहे.
हेही वाचा :
‘रांझा तेरा हीरिये…’ व्हॅलेंटाईन्स डे स्पेशल रोमँटिक गाणं रिलीज
महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने घेतला मोठा निर्णय!
ट्रम्प यांचा दणका.. कंगाल झाले शेअर बाजारातील महारथी, 40 दिवसात बुडाले हजारो करोडो रुपये
गजब बेइज्जती है यार…! हस्तांदोलनासाठी मोदींकडून हात पुढे, पण फ्रान्सच्या अध्यक्षांचं दुर्लक्ष