अचानक फोन फुटला आणि महिलेच्या पॅंटने पेट घेतला पुढे जे घडलं ते धक्कादायक Video Viral

सोशल मीडियावर दररोज अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत (phone deals)असतात. इथे लोक व्हायरल होण्यासाठी अनेक विचित्र गोष्टी करू पाहतात. यात जीवघेणे स्टंट्स, थरारक अपघात आणि जुगाड अशा व्हिडिओजचा समावेश आहे. इथे बऱ्याचदा अशा काही घटनाही शेअर होतात ज्यांची आपण अपेक्षाही केली नसावी. आताही इथे अशाच एका घटनेचा व्हिडिओ वेगाने व्हायरल झाला आहे ज्यात एका तरुणी शॉपिंग करत असताना अचानक तिच्या पॉकेटमध्ये तिचा स्मार्टफोन फुटल्याची घटना घडली.

एवढेच नाही तर हा स्मार्टफोन फुटताच तिच्या पँटला आग लागली आणि काही समजण्याआधीच ही आग वाढत गेली. ही घटना काही साधी सुधी असून आता याचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. ही संपूर्ण घटना दुकानातील कॅमेरात कैद झाली आणि आता याचा व्हिडिओ सोशल मीडियावर(phone deals) ट्रेंड करत आहे. यात नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

सदर व्हिडिओ हा ब्राझीलचा असून इतक्या एका सुपरमार्केटमध्ये एक महिला शॉपिंग करत होती. व्हिडीओमध्ये सुपरमार्केटमध्ये लोकांची खरेदीसाठी झालेली गर्दी दिसत आहे. यावेळी अचानक महिलेच्या पँटच्या पॉकेटमधून धूर निघू लागतो. वृत्तानुसार, महिलेच्या मागच्या खिशात फोन होता ज्याचा स्फोट झाला आणि जिन्सला आग लागली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे तिथले वातावरण भीतीदायक होते. आपल्या खिशाला आग लागली आहे हे जाणवताच महिला इकडे तिकडे पळू लागते यावेळी तिचा पार्टनरदेखील ही आग विझविण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न करताना दिसतो. यावेळी आजूबाजूची लोकही हे सर्व काय घडत आहेत या विचारात हे दृश्य दुरूनच पाहू लागतात आणि इथेच व्हिडिओचा शेवट होतो.

माहितीनुसार, या घटनेत महिला गंभीर जखम झाली आहे. (phone deals)या आगीमुळे तिच्या शरीराचा काही भाग जळला तसेच यात तिचे काही केसही जळाल्याचे सांगितले जात आहे. घटनेचा व्हिडिओ नावाचया एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला, ‘ब्राझीलमधील ॲनापोलिस येथे किराणा मालाची खरेदी करत असताना तिच्या मागच्या खिशात मोबाईलचा स्फोट झाला. हा फोन मोटोरोला मोटो E32 या आहे जो एका वर्षापूर्वी खरेदी केला गेला. मोटोरोलाने या विचित्र घटनेची चौकशी करण्यासाठी महिलेशी संपर्क साधला आहे’ असे कॅप्शन देण्यात आले आहे.

हेही वाचा :

आता फक्त शेतकऱ्यांनाच जमीन विकत घेता येणार

ट्रेनच्या दरवाजात सेल्फी काढणं तरुणाला पडलं महागात, पुढच्याच क्षणी घडलं असं…

मनोज जरांगे पाटलांच्या दोन मागण्या झाल्या मान्य; काय असणार पुढची रणनीती?