सतत बसून काम करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ‘या’ चुका टाळा

आजकाल अनेक लोकांना ऑफिसमध्ये 9 ते 12 तास बसून काम करावे लागते. (pain)सतत बसून काम केल्यामुळे शारीरिक हालचाल कमी होते, ज्यामुळे अनेक आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. शरीरात रक्ताभिसरण नीट होत नाही. पाठदुखी, मानदुखी, खांदेदुखीचा त्रास सुरुवातीला जाणवत नसला तरी, वेळीच लक्ष न दिल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात.

चुकीच्या बसण्याच्या पद्धती आणि उपाय

डेस्क जॉब करणाऱ्यांमध्ये पाठदुखीची समस्या सामान्य(pain) आहे. चुकीच्या पद्धतीने बसल्यामुळे ही समस्या आणखी वाढते. डेस्क जॉब करताना बसण्याच्या पद्धतीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. योग्य स्थितीत बसणे महत्त्वाचे आहे.वाकून बसू नका.
पाठीला आधार मिळेल अशा प्रकारे बसा.चुकीच्या स्थितीत बसल्याने भविष्यात गंभीर दुखापत होऊ शकते.

नियमित ब्रेक आणि व्यायाम

आरोग्य तज्ञांच्या मते, सतत बसून राहणे टाळावे. दर(pain) 30 ते 45 मिनिटांनी छोटा ब्रेक घ्यावा. यामुळे शरीर सक्रिय राहते आणि रक्ताभिसरण सुधारते. तसेच, मानसिक आरोग्य सुधारते. कामाचा ताण जास्त असल्यास, पाणी पिण्यासाठी किंवा चहा-कॉफी घेण्यासाठी स्वतः उठावे, जेणेकरून दर 40 मिनिटांनी ब्रेक घेता येईल.डेस्क जॉब करणाऱ्यांनी दररोज व्यायाम करणे आवश्यक आहे. व्यायामामुळे शरीरातील वेदना कमी होतात. सतत बसून राहिल्याने मान, खांदे आणि कंबरेत वेदना होऊ शकतात. लॅपटॉप बेडवर ठेवून काम करणे टाळावे, कारण यामुळे पाठदुखी वाढू शकते. घरी किंवा ऑफिसमध्ये, बसण्याच्या स्थितीकडे लक्ष द्या आणि योग्य स्थितीत बसा.

हेही वाचा :

आता फक्त शेतकऱ्यांनाच जमीन विकत घेता येणार

ट्रेनच्या दरवाजात सेल्फी काढणं तरुणाला पडलं महागात, पुढच्याच क्षणी घडलं असं…

मनोज जरांगे पाटलांच्या दोन मागण्या झाल्या मान्य; काय असणार पुढची रणनीती?