एक मुलगा, 2 मुली…, भररस्त्यात मुलाचा दोघींसोबत रोमान्स, व्हिडीओ तुफान व्हायरल

शहरांमध्ये अनेकदा सार्वजनिक ठिकाणी प्रेमी युगुलांना फिरताना पाहिले जाते, पण कधीकधी हे प्रकरण वादाचे कारण बनते. असाच एक विचित्र प्रकार समोर आला, जेव्हा एक तरुण गल्लीच्या मध्यभागी दोन तरुणींसोबत रोमान्स (romance)करत होता. हे दृश्य पाहून सोसायटीतील लोक संतापले आणि मग जे झाले, त्याची कोणी कल्पनाही केली नव्हती!

हे प्रकरण एका उच्चभ्रू सोसायटीजवळील गल्लीतील आहे, जिथे एक तरुण दोन तरुणींसोबत खुलेआम रोमान्स (romance)करताना दिसला. तरुण अगदी निश्चिंतपणे दोन्ही तरुणींसोबत उभा होता आणि त्याच्या या वागण्यामुळे आजूबाजूचे लोक संतप्त झाले.

गल्लीत उभ्या असलेल्या अनेकांनी हे दृश्य पाहिले, तेव्हा सुरुवातीला त्यांचा डोळ्यांवर विश्वास बसला नाही, पण जेव्हा प्रकरण वाढू लागले, तेव्हा सोसायटीतील काही ज्येष्ठ नागरिक आणि महिलांचा राग अनावर झाला.

सोसायटीतील लोकांनी सुरुवातीला या जोडप्याला समजावण्याचा प्रयत्न केला, पण तरुण ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता, तेव्हा काही लोकांनी घरातून पाणी फेकण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर चप्पल फेकून मारण्यास सुरुवात केली.

कोणी छतावरून बादलीभर पाणी ओतले, तर कोणी हातात चप्पल घेऊन आले. बघता बघता संपूर्ण परिसरात गोंधळ उडाला. तरुण आणि दोन्ही तरुणी अचानक झालेल्या या ‘चप्पल आणि पाण्याच्या वर्षावामुळे’ गोंधळून गेले आणि तिथून पळ काढला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ कोणीतरी रेकॉर्ड केला आणि सोशल मीडियावर अपलोड केला. आता हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे आणि लोक यावर मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.

हेही वाचा :

हॉटेलच्या रूममध्ये कॅमेरा लपवलेला असेल का स्मार्टफोनच्या मदतीने असं ओळखा

टॉयलेटमधील नळाच्या पाण्यात बनवला स्वयंपाक नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट Video Viral

१ एप्रिलपासून सर्व वाहनांसाठी फास्टॅग अनिवार्य; अन्यथा भरावा लागेल दुप्पट टोल