तरुणीवर अत्याचार केला, व्हिडिओही काढला अन् नंतर…

गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात महिलांवरील (registered)अत्याचाराच्या घटना लक्षणीय आहेत. असे असताना आता अमरावतीत लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीवर अत्याचार करण्यात आला. तसेच व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. ही घटना शनिवारी दि. 15 फ्रेजरपुरा ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

वैभव नामदेव खोरे वय 27, रा. कल्याणनगर असे आरोपीचे नाव आहे. पीडित तरुणी ही शिक्षण घेत असून, 2019 मध्ये तिचे वैभवसोबत प्रेमसंबंध होते. दरम्यान, वैभव हा तिला मारहाण करत असल्याने तिने त्याच्याविरुद्ध फ्रेजरपुरा ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्या प्रकरणात तो काहीकाळ कारागृहातही होता. दरम्यान, वैभव हा कारागृहामधून सुटून आल्यानंतर तिच्याशी पुन्हा बोलायला लागला. मात्र, वैभव हा सुधारणार नाही, हे माहित असल्याने ती त्याच्यापासून लांबच राहत होती. परंतु, त्यानंतरही त्याने तरुणीचा विश्वास संपादन करुन तिच्याशी मैत्री(registered) केली. त्यानंतर त्यांच्यात पुन्हा संवाद सुरू झाला.
दरम्यान, आपल्याला मंगळ आहे, मंगळाची पूजा माझ्या मावशीकडे मध्य प्रदेशातील खंडवा येथे आहे, अशी बतावणी वैभवने तिच्याकडे केली. त्यानुसार, 8 जानेवारी रोजी तरुणी ही वैभव व त्याच्या आईसोबत खंडवा येथे गेली. 25 जानेवारी रोजी ते अमरावतीत परत आले. त्याच दिवशी लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या प्रकाराची वाच्यता केल्यास व्हिडिओ व फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली.

तालुक्यातील टाकेद बुद्रुक येथील एका कॉलेजच्या प्राचार्याने शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना केल्याचे उघडकीस आली आहे. शाळेतील अल्पवयीन मुलीला घरकामाच्या नावाखाली स्वतःच्या घरी बोलावून अत्याचार केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे या शाळेच्या मुख्याध्यापकानेच इतर शिक्षकाच्या मदतीने 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे शुक्रवार दि. ७ रोजी उघडकीस आले आहे.लग्नाचे आमिष(registered) दाखवून एका 25 वर्षीय तरुणाने अल्पवयीन मुलीवर सतत 6 महिने अत्याचार केला. या अत्याचारानंतर अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली. याप्रकरणी मोर्शी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा :
‘फक्त दोन तास ईडी आमच्या हातात द्या, अमित शाह सुद्धा’… ; संजय राऊत यांचा घणाघात
रिलायन्स जिओची सर्वात धमाकेदार ऑफर: 50 दिवसांसाठी मोफत इंटरनेट त्यासोबत…
चिकन खाणाऱ्यांनो सावधान! डॉक्टरांनी दिली सर्वात महत्त्वाची माहिती